हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । PPF : केंद्र सरकारकडून देशातील नागरिकांसाठी अनेक योजना चालवल्या जातात. ज्या अंतर्गत मोठा फायदा देखील मिळतो. नुकतेच सरकारकडून पीपीएफ योजनेबाबत माहिती देण्यात आली आहे. हे जाणून घ्या कि, केंद्र सरकार कडून यामध्ये वेळोवेळी काही बदल केले जातात. त्यामुळे जर आपण यासाठीच्या नियमांची माहिती ठेवली नाही तर आपले नुकसान होऊ शकेल. चला तर मग PPF योजनांमध्ये काय बदल झाले आहेत ते जाणून घेउयात…
कमी पैशांतून करता येते गुंतवणूक
हे जाणून घ्या कि, सरकारच्या बचत योजनांमध्ये कमी पैशांतही गुंतवणूक करता येते. या योजनांमध्ये पैसे देखील सुरक्षित राहतात. यामध्ये 1.50 लाखांपर्यंत पैसे जमा करता येतील. सध्या PPF वर 7.10 टक्के दराने व्याज दिले जात आहे.
महिन्यातून एकदाच पैसे जमा करता येतात
PPF मध्ये 1 वर्षात कमीत कमी 500 रुपयांपर्यंतची गुंतवणूक करता येते. तसेच यामध्ये 1 वर्षात 1.5 लाख रुपयांपर्यंतची रक्कम जमा करून कर सवलतीचा लाभही मिळतो. त्याच प्रमाणे जर आपल्याला हवे असेल तर त्यात दरमहा पैसे जमा करण्याची सुविधा देखील मिळते.
15 वर्षानंतरही खाते होणार नाही बंद
15 वर्षांनंतर यामध्ये गुंतवणूक करणे थांबवले जाते. तसेच जर यापुढेही आपल्याला गुंतवणूक सुरु ठेवायची असेल तर 15 वर्षांनंतरही तसे करता येईल, मात्र त्यानंतर 1 वर्षातून एकदाच पैसे काढता येतील.
अशा प्रकारे उघडा खाते
पीपीएफ खाते उघडण्यासाठी फॉर्म-1 सबमिट करावा लागेल. तसेच 15 वर्षानंतरही गुंतवणूक करण्यासाठी फॉर्म-4 मध्ये अर्ज करावा लागेल.
पीपीएफ खात्यावर अशा प्रकारे मिळवा कर्ज
पीपीएफ खात्यावर सहजपणे कर्ज मिळवता येते. यामध्ये PPF खात्यामध्ये जमा असलेल्या रकमेच्या फक्त 25% रक्कम कर्ज म्हणून मिळेल.
अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : http://www.nsiindia.gov.in/InternalPage.aspx?Id_Pk=55
हे पण वाचा :
‘या’ Multibagger Stock ने अवघ्या 1 महिन्यात शेअरधारकांचे पैसे केले दुप्पट !!!
Kotak Mahindra Bank च्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी !!! बँकेने FD वरील व्याजदर 50 Bps ने वाढवले
Lunar Eclipse : वर्षातील पहिले चंद्रग्रहण ‘या’ दिवशी होणार, जाणून घ्या त्याविषयीची महत्त्वाची माहिती
आपल्यामागे Satish Kaushik यांनी सोडली कोट्यवधींची संपत्ती, दर महिन्याला कमावायचे इतके पैसे
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात नरमाई, पहा आजचे नवीन भाव