हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मध्य रेल्वे (Central Railway) आपल्या प्रवाश्यांचा प्रवास हा अधिक सोयीस्कर, सुखकर तसेच सुरक्षित व्हावा यासाठी नेहमीच प्रयत्नशील असते. त्यासाठी विविध योजनाही आखल्या जातात. त्यातच आता मध्य रेल्वेने प्रवास हा सुरक्षित करण्यासाठी एकूण 30 ठिकाणचे लेव्हल क्रॉसिंग फाटक बंद केले आहे. तसेच आगीच्या घटना टाळण्यासाठी 420 स्मोक डिटेक्टर बसवण्यात आले आहेत. आगीच्या घटना होऊ नये यासाठी रेल्वेच्या डब्ब्यामध्ये आणि शक्तीयान मध्ये धूर शोधक व धूर शामक यंत्रणा बसवण्यात येत आहे. त्यामुळे होणारे अपघात टाळले जाऊ शकतात.
लेव्हल क्रॉसिंग गेट्स बंद केल्याने वेळेत नियमितता राखण्यात होते मदत
मध्य रेल्वेने (Central Railway) प्रवास करणारे प्रवासी जास्त असल्यामुळे लेव्हल क्रॉसिंग करताना अनेक अपघात होतात. हे लक्षात घेऊन मध्य रेल्वेवर रोड अंडरब्रीज बांधून लेव्हल क्रॉसिंग गेट्स बंद केले जात आहेत. या लेव्हल क्रॉसिंग गेट्स बंद केल्याने वेळेत नियमितता राखण्यात मदत होते आणि सुरक्षितता वाढते. त्यामुळे हे पाऊल मध्य रेल्वेकडून उचलण्यात आले आहे.
कोणत्या भागात करण्यात आले गेट बंद?
मध्य रेल्वेने घेतलेल्या निर्णयामध्ये एकूण 30 ठिकाणचे फाटक बंद करण्यात आले आहे. त्यामध्ये एप्रिल ते नोव्हेंबर या कालावधीत मध्ये हे गेट बंद करण्यात आले आहे. त्यापैकी भुसावळ विभागातील 10 , नागपूर विभागातील 8 , पुणे विभागातील 6 , मुंबई विभागातील 5 आणि सोलापूर विभागातील 1 असे गेट बंद करण्यात आले आहे.
कश्या सुरक्षित होतात गाड्या?
मध्य रेल्वेने (Central Railway) घेतलेल्या निर्णयानुसार ब्लॉक प्रोव्हिंग एक्सल काउंटर प्रणालीद्वारे एका विभागामध्ये दुसऱ्या ट्रेनला परवानगी देण्यापूर्वी रेल्वे रूळ रिकामा असल्याची खात्री करते. यंत्रणेत असलेले सेन्सर्स इंजिन चालक आणि गार्डच्या दोन्ही बाजूहून जाणाऱ्या एक्सलची संख्या तपासतात. त्यामध्ये जर संख्या एकमेकांशी जुळत नसेल यामध्ये कोणतीही त्रुटी नसते. या त्रुटी न निघाल्यामुळे गाड्यांची सुरक्षितात वाढते आणि प्रवाश्यांचा प्रवाशी सुरक्षित होतो.
मध्य रेल्वेवर एकूण 23 ब्लॉक प्रोव्हिंग एक्सल काउंटर प्रदान करण्यात आले- Central Railway
ब्लॉक प्रोव्हिंग एक्सल काउंटर प्रणालीद्वारे रेल्वे गाड्या सुरक्षित ठेवल्या जातात. त्यामुळे एप्रिल ते नोव्हेंबर मध्ये मध्य रेल्वेवर एकूण 23 ब्लॉक प्रोव्हिंग एक्सल काउंटर प्रदान करण्यात आले आहेत. ज्यामध्ये मुंबई विभागातील 2 , भुसावळ विभागातील 2 , नागपूर विभागातील 6 , पुणे विभागातील 4 आणि सोलापूर विभागातील 9 असा समावेश आहे. एकूण साथ चाचण्या करण्यात आल्या आहेत.