हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मध्य रेल्वे विभागाने एक मोठा निर्णय घेतला आहे. मध्य रेल्वेने या महत्वपूर्ण दिनानिमित्त 14 अनारक्षित विशेष रेल्वेगाड्या सोडण्याचे जाहीर केले आहे. नागपूर ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी 3, सीएसएमटी-दादर ते सेवाग्राम- अजनी- नागपूरसाठी 6 आणि अजनी ते सीएसएमटीसाठी 1 अशा पद्धतीने या रेल्वे गाड्या सोडण्यात येणार आहेत.
दरवर्षी 6 डिसेंबर रोजी म्हणजेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त लाखो संख्येने जनसमुदाय चैत्यभूमीवर त्यांना अभिवादन करण्यासाठीयेत असतो. या दिनानिमित्त दरवर्षी रेल्वे विभागाकडून ज्यादा गाड्या सोडण्यात येतात. त्यानुसार यावर्षी देखील मध्य रेल्वेने 14 विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
कसे असेल वेळापत्रक
या विशेष गाड्यानुसार, 4 डिसेंबर रोजी नागपूर- मुंबई ०१२६२ ही रेल्वेगाडी नागपूर येथून 23.55 वाजता सुटेल. ती सीएसएमटी येथे 5 डिसेंबर रोजी 15.30 वाजता पोहचेल. तर दुसरी रेल्वेगाडी 5 तारखेला नागपूर येथून 8 वाजता सुटेल आणि ती सीएसएमटी 23.45 वाजता पोहचेल. 01266 ही रेल्वेगाडी 5 डिसेंबर रोजी नागपूरमधून 15.50 वाजता सुटेल आणि ती मुंबईत 10.55 ला पोहचेल.
त्याचबरोबर, मुंबई-दादर ते सेवाग्राम- अजनी- नागपूर अनारक्षित रेल्वे गाडी 6 डिसेंबर रोजी 16.45 वाजता सीएसएमटी येथून सोडण्यात येईल. ती अजनीत दुसऱ्या दिवशी 9.30 वाजता पोहचेल. 01251 ही रेल्वे गाडी 6 डिसेंबरला 18.35 वाजता मुंबई येथून सुटेल आणि ती सेवाग्राम येथे दुसऱ्या दिवशी साडेदहा वाजता पोहोचत. 01253 रेल्वे गाडी 7 डिसेंबर रोजी दादर येथून 00.40 वाजता सुटेल आणि ती अजनी येथे 15.55 वाजता पोहचेल.
7 डिसेंबर रोजी 01255 ही रेल्वेगाडी 12.35 वाजता मुंबई वरून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी नागपूर येथे तीन वाजता पोहोचेल. 01256 ही रेल्वेगाडी 8 डिसेंबर रोजी 18.35 वाजता मुंबईतून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी नागपूर येथे 12.10 वाजता पोहचेल. 01259 ही रेल्वे गाडी 8 डिसेंबर रोजी दादर येथून 00.40 वाजता सुटून अजनीत 15.55 वाजता पोहचेल. तसेच, अजनी-मुंबई 02040 ही सुपरफास्ट रेल्वेगाडी अजनी येथून निघून ती 7 डिसेंबर रोजी 13.30 वाजता निघून सीएसएमटी दुसऱ्या दिवशी 04.10 वाजता पोहचेल.