हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मुंबई आणि पुणे ट्राफिकच्या गर्दीमुळे अनेकजण रेल्वेचा मार्ग अवलंबवतात. तसेच येथील लोकांची प्रवासाची संख्या ही प्रचंड मोठी आहे. त्यातच सध्या सणासुदीच्या दिवसामुळे गर्दी प्रचंड वाढते आहे. यामुळे प्रवाश्यांची फजिती होती आणि नाहक त्रास सहन करावा लागतो. मात्र हीच फजिती रोखण्यासाठी मध्य रेल्वेने (Central Railways) मोठा निर्णय घेतला आहे. मुंबई ते दानापूर आणि पुणे ते दानापूरसाठी प्रवासी संख्या अधिक असल्यामुळे या मार्गावर असलेल्या 22 विशेष गाड्यांचा कालावधी वाढवण्यात आला आहे.
मध्य रेल्वे (Central Railways) नेहमीच कोणता ना कोणता निर्णय प्रवाश्यांचा फायद्यासाठी घेत असते. त्यात आता पुन्हा एकदा प्रवाश्यांचा विचार करून 22 रेल्वे बाबत निर्णय घेतला आहे. त्यामुळे मध्य रेल्वेने घेतलेल्या या निर्णयामुळे प्रवाश्यांचे होणारे हाल दूर होतील आणि छट पूजेसाठी तसेच दिवाळीसाठी गेलेल्या प्रवाश्यांना याचा दिलासा मिळणार आहे.
कोणत्या गाड्यांचा आहे समावेश?
मध्य रेल्वेने एकूण 22 विशेष गाड्यांचा प्रवासाचा कालावधी वाढवला आहे. यामध्ये लोकमान्य टिळक टर्मिनस – सिवान साप्ताहिक स्पेशल, छपरा – लोकमान्य टिळक टर्मिनस साप्ताहिक विशेष, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – दानापूर साप्ताहिक स्पेशल, दानापूर – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस साप्ताहिक स्पेशल, पुणे – दानापूर द्वि-साप्ताहिक स्पेशल तसेच पुणे – दानापूर साप्ताहिक स्पेशल, दानापूर – पुणे साप्ताहिक स्पेशल या गाड्यांचा समावेश आहे.
कोणत्या गाड्या कधीपर्यंत धावतील? Central Railways
• लोकमान्य टिळक टर्मिनस – सिवान साप्ताहिक स्पेशल गाडी – 26 नोव्हेंबर ऐवजी 3 डिसेंबर पर्यंत चालवली जाणार आहे.
• छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – दानापूर साप्ताहिक स्पेशल ही गाडी – 9 डिसेंबर पर्यंत चालवली जाणार आहे.
• छपरा – लोकमान्य टिळक टर्मिनस साप्ताहिक स्पेशल गाडी -1 डिसेंबर पर्यंत चालवली जाणार आहे.
• दानापूर – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस साप्ताहिक स्पेशल गाडी – 10 डिसेंबर पर्यंत चालवणार आहे. तर
• पुणे – दानापूर द्वि-साप्ताहिक स्पेशल गाडी – 14 डिसेंबर पर्यंत चालणार आहे.
• दानापूर- पुणे द्वि-साप्ताहिक स्पेशल गाडी – 15 डिसेंबर पर्यंत चालवली जाणार आहे. त्यामुळे परतीच्या प्रवाश्यांना याचा दिलासा मिळणार आहे. तसेच गाड्याचा कालावधी वाढवल्यामुळे गर्दीलाही आळा बसणार आहे. असे म्हणायला हरकत नाही.