नवी दिल्ली । कलम ३७० काढून रद्द केल्यांनतर गेल्या वर्षभरापासून जम्मू आणि काश्मीर खोऱ्यात इंटरनेट सुविधा ठप्प आहे. दरम्यान, जम्मू आणि काश्मीरमध्ये इंटरनेट पुन्हा सुरु करण्याचा केंद्राचा विचार आहे. त्यानुसार १५ ऑगस्टनंतर जम्मू आणि काश्मीरमधील काही भागात ४ जी इंटरनेट सेवा सुरू होण्याची शक्यता आहे. जम्मू काश्मीरच्या प्रत्येकी एका जिल्ह्यात हाय स्पीड इंटरनेट सुविधा अगोदर ट्रायल म्हणून सुरू करण्याची तयारी पूर्ण झालीय. ही सुविधा जम्मू काश्मीर खोऱ्यात १५ ऑगस्टनंतर सुरू केली जाईल. त्यानंतर दोन महिन्यांनी याची समिक्षा केली जाईल. आजसर्वोच्च न्यायालयात जम्मू काश्मीरमध्ये ४ जी इंटरनेट सेवा देण्याच्या याचिकेवर मंगळवारी सुनावणी दरम्यान केंद्र सरकारनं हे स्पष्टीकरण दिलंय.
४ जी इंटरनेट सेवेच्या ट्रायलसाठी शक्य असलेल्या जिल्ह्याची अगोदर निवड केली जाईल. त्यानंतर ४ जी सुविधा पुरविली जाईल, असं केंद्राची बाजू मांडणाऱ्या एटर्नी जनरल के के वेणुगोपाल यांनी कोर्टासमोर म्हटलं. समितीच्या म्हणण्यानुसार सध्या शैक्षणिक संस्था आणि रुग्णालयांसाठी लँडलाईन माध्यमातून ब्रॉडबॅन्ड सुविधा उपलब्ध असल्याचंही त्यांनी म्हटलंय. विशेष समितीच्या सल्ल्यानुसार, कमी हिंसा क्षेत्रांची ओळख पटवून उच्च गतीचं इंटरनेट ट्रायल म्हणून सुरू केलं जाऊ शकतं. केंद्रानं घेतलेल्या भूमिकेचं न्यायालयानं कौतुक केलंय. पंरतु, या प्रकरणाचे आदेश सार्वजनिक क्षेत्रात असायला हवेत, असंदेखील न्यायमूर्ती एन व्ही रमना यांनी म्हटलंय. १६ ऑगस्टपासून जम्मू आणि काश्मीर विभागातील प्रत्येक जिल्ह्यात सूट दिली जाईल. दोन महिन्यांनंतर त्याची समिक्षा केली जाईल, असं केंद्रानं म्हटलं आहे.
या मुद्द्यावर विशष समितीनं १० ऑगस्ट रोजी तिसरी बैठक घेतली होती. स्थानिक एजन्सीशी सल्लामसलत करून आणि सुरक्षेला ध्यानात ठेवून वेगवेगळ्या पर्यायांवर विचार करण्यात आला. इंटरनेट बंदीमुळे कोविडविरुद्धची लढाई, शिक्षण किंवा व्यवसायात कोणताही अडथळा होत नसल्याचंही समितीचं म्हणणं आहे. सद्य परिस्थिती मोबाईल फोनसाठी हाय स्पीड इंटरनेट सेवा देण्यासाठी अनुकूल नाही. जम्मू काश्मीरमध्ये अजूनही धोका अधिक असल्याचं समितीचं म्हणणं आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”