राज्य शासनाने विविध विषयांच्या सर्व CET परीक्षा पुढे ढकलल्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । ‘सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाच्या (CET- सेल) माध्यमातून दरवर्षी उच्च शिक्षण आणि तंत्र शिक्षण विभागाच्या विविध विषयांच्या प्रवेश परीक्षा घेण्यात येतात. सध्या संपूर्ण देशात आणि महाराष्ट्रात कोविड- 19 चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन या सर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. विद्यार्थी आणि पालकांकडून या प्रवेश परीक्षा पुढे ढकलण्याविषयी सातत्याने मागणी होत होती. विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला असून या सर्व परीक्षांच्या तारखा नव्याने जाहीर करण्यात येतील अशी माहिती राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली.

मागील महिन्यात या परीक्षा जुलै महिन्यात घेणार असल्याचं सांगत जेव्हा तारखा जाहीर करण्यात आल्या होत्या. तेव्हा कोरोनाच्या त्यावेळेसच्या परिस्थितीचा विचार करून निर्णय घेण्यात येणार असल्याचे उच्च व तंत्रशिक्षण विभागाने सांगितले होते. त्यानुसारच हा निर्णय घेण्यात आला आहे. उच्च व तंत्रशिक्षण विभागांतर्गत येणाऱ्या पदवी आणि पदव्युत्तर व्यावसायिक अभ्यासक्रम परीक्षा यामध्ये अभियांत्रिकी, फार्मसी, आर्किटेक्स्चर , कृषी अभ्यासक्रम, हॉटेल मॅनेजमेंट, लॉ अभ्यासक्रम या सारख्या अभ्यासक्रमाच्या राज्य सामायिक प्रवेश परीक्षा CET परीक्षा दरवर्षी मे, जून महिन्यात घेण्यात येतात.

मात्र यावर्षी कोरोनाचा संसर्ग पाहता लॉकडाऊन मुळे या परीक्षेच्या तारखा 6 जुलै ते 31 जुलै दरम्यान सीईटी परीक्षा घेण्यात येणार होत्या. यामध्ये जे विद्यार्थी परीक्षा जर देऊन शकले नाहीत तर 3, 4 आणि 5 ऑगस्टला विद्यार्थ्यांसाठी परीक्षा घेण्यात होणार होती .पण आता पुन्हा कोरोनाची स्थिती पाहून पुढील वेळापत्रक ठरवलं जाणार आहे आणि नवीन तारखा शिक्षण विभागाकडून जाहीर करण्यात येतील. याशिवाय, विद्यार्थ्यांना आधी सांगितल्याप्रमाणे परीक्षेसाठी केंद्र बदलून घेण्याची सुद्धा सवलत यामध्ये देण्यात आली होती.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

 

Leave a Comment