नवी मुंबईमध्ये चोरट्यांचा हैदोस, चैन चोरीची आणखी एक घटना आली समोर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी मुंबई : हॅलो महाराष्ट्र –सध्या चोरीच्या (chain snatching) अनेक घटना समोर येत असल्याचे आपण पाहत आहोत. त्याचे अनेक व्हिडिओ देखील व्हायरल होत असताना दिसत आहेत. अशाच पद्धतीची एक चोरीची (chain snatching) घटना नवी मुंबई येथे घडल्याची समोर आली आहे. संपूर्ण घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे.

व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो एक महिला लहान मुलाला घेऊन सोसायटीच्या आत मध्ये प्रवेश करत आहे. महिला सोसायटीमध्ये आत प्रवेश करताच एक तरुण तिच्या मागून धावून येतो आणि तिच्या गळ्यातील सोन्याची चैन (chain snatching) खेचून तिथून पळ काढतो. त्या महिलेला काही कळण्याआधीच तो वेगाने तिथून निघून जातो. ही संपूर्ण घटना सोसायटीत असलेल्या सीसीटीव्ही कॅमेरा कैद झाली आहे.

या संपूर्ण घटनेमुळे (chain snatching) परिसरात एकच खळखळ उडाली आहे. त्याचबरोबर भीतीचे वातावरण देखील पसरले आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे नवी मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरू केला आहे.

हे पण वाचा :
Senior Citizen Saving Scheme च्या व्याजदरात बदल
मुलं चोरणारा समजून नागरिकांकडून तरुणाला बेदम मारहाण, Video आला समोर
Repo Rate वाढल्यामुळे कर्ज महागणार तर FD वर मिळणार जास्त व्याज !!!
मला कुत्रा निशाणी दिली तरी मी निवडून येईल; सत्तारांचे विधान चर्चेत
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी!! UPSC अंतर्गत 253 जागांसाठी भरती