डिस्ने करणार आपल्या अधिकाऱ्यांच्या पगारात कपात

0
34
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रत्येक देश त्यांना शक्य होईल त्या उपाययोजना करत आहे. त्यामुळे अनेक देशांमध्ये अत्यावश्यक सुविधा सोडल्या तर सारं काही बंद आहे. मात्र या बंदचा परिणाम मात्र अर्थव्यवस्थेवर होताना दिसत आहे. तसंच या बंदच्या काळामध्ये मोठमोठ्या कंपन्यांनाही आर्थिक समस्यांना समोरं जावं लागत आहे. यामध्येच डिस्ने या हॉलिवूडच्या एन्टरटेन्मेंट कंपनीने एक मोठा निर्णय घेतला आहे.

बऱ्याच देशांमध्ये लॉकडाउन असंल्यामुळे अनेक मोठ्या कंपन्यांचं काम बंद पडलं आहे. या कंपन्यांमध्ये डिस्ने या प्रख्यात कंपनीचादेखील समावेश आहे. त्यामुळे डिस्नेकडून कंपनीत उच्च पदावर कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांच्या मासिक वेतनात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे.

कंपनीचे एक्झिक्युटीव्ह चेअरमन बॉब आयगर यांनी आपण एक महिन्याचं वेतन घेणार नसल्याचे जाहीर केले आहे. तर कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) बॉब चॅपक यांना मासिक पगारातील केवळ ५० टक्केच वेतन मिळणार आहे. बॉब यांनी नुकताच डिस्ने कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा पदभार स्वीकारला आहे

लॉकडाउन असल्यामुळे डिस्नेचे थीम पार्क,प्रोडक्शन आणि थिएटर्स सारं काही बंद आहे. त्यामुळे सध्या कंपनीवर आर्थिक संकट आलं आहे.त्यामुळे उच्च पदावर असलेल्या अधिकाऱ्यांनी वेतनात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. ‘न्युयॉर्क टाइम्स’च्या ब्रूक बॉर्न्स यांनी कंपनीच्या मेलचा एक फोटो शेअर करत ही माहिती दिली आहे.

दरम्यान,कोरोना विषाणूमुळे सध्या सगळ्याच देशांमध्ये भीतीचं वातावरण आहे. त्यामुळे प्रत्येक देश त्यांना शक्य होईल त्या उपाययोजना करत आहे. आतापर्यंत जगात हजारो लोकांना करोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे.

 

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here