Tuesday, June 6, 2023

ठाकरे, पवार यांना चॅलेंज, हिम्मत असेल तर आडवा : किरीट सोमय्या

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

सरकारने स्वतःची इज्जत वाचवण्यासाठी माझ्यावरची कोल्हापूर जिल्हाबंदी उठवली.बंदीला कोण विचारतो. मी कोल्हापूरला अंबाबाई मंदिराच्या दर्शनासाठी जाणार. भ्रष्टाचाऱ्यांची पाळेमुळे खणून काढणार आहे. मी ठाकरे, पवार यांना चॅलेंज करतो, हिम्मत असेल तर मला आडवावे असे आवाहन भाजपचे नेते व माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केले.

कराड तालुक्यातील उंब्रज येथे पत्रकारांशी ते बोलत होते.कोल्हापूर दौऱ्यावर निघालेल्या किरीट सोमय्या यांचे स्वागत करण्यासाठी कराड, उंब्रज येथे महामार्गावर भाजपा कार्यकर्ते थांबले होते. यावेळी जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, कराड उत्तर तालुका अध्यक्ष महेशकुमार जाधव, जिल्हा सरचिटणीस महेंद्रकुमार डुबळ, जिल्हाध्यक्ष ओबीसी मोर्चा अँड.विशाल शेजवळ, जिल्हाउपाध्यक्ष सुरेश पाटील, रामकृष्ण वेताळ, सागर शिवदास, सौ. गुणवंत, बापू बैले,शहाजी मोहिते, अनिकेत जाधव, स्वप्नील ढवळे, महेश जाधव, दत्तात्रय साळुंखे, सुनील जाधव, संजय पाटील यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

 

किरीट सोमय्या म्हणाले कोल्हापूरच्या अंबाबाई चे दर्शन घेउन मी भ्रष्टाचाराच्या राक्षसाचा वध करणार आहे. माझ्यावर जिल्हा बंदी करण्याची हिंमत ठाकरे पवार यांच्यात नाही. मी त्यांना चालेंज करतो हिम्मत असेल तर अडवून दाखवा जनता किरीट सोमय्या च्या पाठीशी आहे. जिल्हाधिकारी काल रात्री आदेश काढून माझ्या वरील बंदी उठवली आहे मला बंदीचे काही घेणे देणे नाही, या घोटाळेबाजांना बंद करणं हे माझं काम आहे.