इंझमाम उल हकला हृदयविकाराचा झटका; प्रकृती स्थिर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पाकिस्तानचा माजी दिग्गज खेळाडू इंझमाम उल हक ला हृदयविकारांचा झटका आला आहे. इंझमाम वर अँजिओप्लास्टी करण्यात आली असून आता त्याची प्रकृती स्थिर आहे. गेल्या काही दिवसांपासून इंझमामच्या छातीत दुखत होते.

क्रिकेट विश्वातील ईएसपीएन आणि क्रिकइन्फोने यासंदर्भात वृत्त दिले असून इंझमामला रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. त्याच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली असून सध्या त्याची प्रकृती स्थीर असल्याचे इंझमामच्या प्रवक्त्याने सांगितले आहे. याबाबतचे वृत्त समजताच इंझमामच्या चाहत्यांनी त्याच्या दीर्घायुष्यासाठी आणि लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना सुरू केली आहे.

इंझमाम उल हक पाकिस्तान चा दिग्गज खेळाडू असून पाकिस्तानच्या सर्वात यशस्वी कर्णधार मध्येही तो अव्वल आहे. ५१ वर्षीय इंझमामने पाकिस्तानसाठी ३७५ एकदिवसीय सामन्यांमध्ये एकूण ११ हजार ७०१ धावा केल्या आहेत. तसेच कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या पाकिस्तानी खेळाडूंच्या यादीत इंझमाम तिसऱ्या स्थानी आहे. कसोटीमध्ये ११९ सामन्यांमध्ये त्याने ८ हजार ८२९ धावा केल्यात.

You might also like