Sunday, May 28, 2023

Chanakya Niti : ‘या’ 3 चुकांमुळे मोठ्यात मोठा धनशेठही होतो गरीब; वेळीच व्हा सावध

हॅलो महाराष्ट ऑनलाईन । आचार्य चाणक्य यांनी माणसाला कार्यक्षम (Chanakya Niti) जीवन जगण्यासाठी अनेक तत्वे दिली आहेत. आचार्य चाणक्यांच्या नीतीचे पालन करून अनेकांनी जगावर राज्य केले आहे. चाणक्यनीती मध्ये पैशांची बचत आणि कमाई यासंबंधी अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. चाणक्यानी आपल्या तत्वात अशा काही गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या केल्याने सर्वात श्रीमंत माणूसही काही दिवसात गरीब होतो. चला जाणून घेऊया अशा कोणत्या गोष्टी आहेत.

चुकीच्या मार्गाने मिळवलेला पैसा –

आचार्य चाणक्याच्या मते, जो मनुष्य मेहनत, कष्ट आणि प्रामाणिकपणे पैसा कमावतो त्याच्यासोबत लक्ष्मी कायम राहते. परंतु चुकीच्या हेतूने किंवा चुकीच्या मार्गाने पैसे कमावणाऱ्या लोकांसोबत लक्ष्मी माता जास्त काळ राहत नाही. जुगार, एखाद्या गोष्टीचे व्यसन, दोन नंबरच्या कामामुळे माता लक्ष्मी लवकर रागावते आणि त्या व्यक्तीची साथ कायमची सोडून देते. त्यांनतर त्या व्यक्तीला गरिबीचा सामना करावा लागतो.

चुकीच्या ठिकाणी पैसे लावणे-

काही लोक त्यांच्याकडे असलेल्या पैशाचा वापर आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी तसेच जनतेच्या कल्याणासाठी करतात आणि पुण्य कमवतात. परंतु समाजात असेही काही लोक असतात जे आपल्याकडे असलेल्या पैशाचा चुकीचा वापर करतात. आणि चुकीच्या ठिकाणी पैसे वापरतात. चाणक्याच्या मते अशा प्रकारे चुकीच्या ठिकाणी पैसे लावले तर त्या माणसाची वाटचाल गरिबीकडे होण्यास सुरुवात होते.

पैशाची उधळपट्टी-

काही लोक हि पैशाची उधळपट्टी करणारे असतात. ते आयुष्यात जो काही पैसे कमवतात तो सर्व अनावश्यक खर्च आणि आपले नाद पूर्ण करण्यासाठी खर्च करतात. त्या पैशाची बचत तर खूप लांबची गोष्ट आहे. चाणक्यनीती नुसार, या लोकांसोबत लक्ष्मी माता जास्त काळ राहत नाही.