नवी दिल्ल्ली प्रतिनिधी | भारतीय वायुसेनेचे विंग कमांडर अभिनंदन वर्थमान पाकिस्तानच्या ताब्यात आहेत. याचा फायदा घेत पाकिस्ताननं भारतावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. भारतीय वैमानिकाची सुटका करुन तणाव निवळणार असेल, तर त्याला सोडायला तयार अशी भूमिका गुरुवारी पाकिस्तानी परराष्ट्र मंत्रालयानं जाहीर केली आहे.
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे कि,’आमच्या वैमानिकाची कुठल्याही अटींशिवाय तात्काळ सुटका करावी.’ अशा शब्दात भारताने पाकिस्तानला प्रतिउत्तर दिले आहे. विंग कमांडर अभिनंदन यांच्या सुटकेबाबत आम्ही लवकरच निर्णय घेऊ अशी माहितीही पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने दिली आहे. त्यामुळे आता विंग कमांडर अभिनंदन यांच्या सुटकेच्या शक्यता बळावल्या आहेत.
पाकिस्तान याआडून कंदाहार प्रमाणे दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे.कोणत्याही दबावाला भारत बळी पडणार नाही,असे भारताने पाकिस्तानला ठणकावून सांगितले आहे. आधी दहशतवाद्यांवर कारवाई करा, मगच बातचीत करू, अशीच भारताची पाकिस्तानसंदर्भात भूमिका राहणार आहे.पाकिस्ताननं दहशतवादाविरोधात तातडीनं, कठोर आणि विश्वासार्ह कारवाई करावी, अशी भूमिका भारतानं घेतली आहे. पाकिस्ताननं अभिनंदन यांना सहीसलामत भारताकडे सोपवावं, त्यांना काही झालं तर भारताला मोठी कारवाई करावी लागेल,असा इशारा भारतानं पाकिस्तानला दिला आहे.
इतर महत्वाचे –
हेलिकॉप्टर दुर्घटनेत नाशिकचे पायलट निनाद शाहिद