हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : पुण्यातील कोरोना स्थितीचाची माहिती घेतलयानंतर बुधवारी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार उपलब्ध नाहीत. ते सध्या आहेत तरी कुठे? असा सवाल उपस्थित करीत अजित पवार यांना पुण्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी झेपत नसेल तर त्यांनी हे पद सोडावं, अशी मागणीही केली. चंद्रकांत पाटील यांना राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी ट्विटरच्या माध्यमातून टोला लगावला आहे.
चाकणकर यांनी ट्विटरच्या माध्यमातून म्हंटल आहे की, भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत दादांनी एकदा चष्म्याच्या काचा स्वच्छ पुसाव्यात. त्यांना सकाळी ६ वाजता जनतेच्या कामासाठी धावणारे दादा दिसतील !. असे ट्विट करून चाकणकर यांनी चंद्रकांत पाटील यांना टोला लगावला आहे. तसेच त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कामाबाबत पाटील याना माहिती दिली आहे.
चंद्रकांत दादांनी एकदा चष्म्याच्या काचा स्वच्छ पुसाव्यात. त्यांना सकाळी ६ वाजता जनतेच्या कामासाठी धावणारे दादा दिसतील! https://t.co/c5eR64Py99
— Rupali Chakankar (@ChakankarSpeaks) April 21, 2021
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी पुणे येथील कोरोना परिस्थितीची माहिती घेतल्यानंतर पुण्यातील प्रसिद्धी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी पाटील यांनी अजित पवार यांच्यावर टीकेची तोफ डागली होती. पुण्यात कोरोना परिस्थिती हाताबाहेर जात असताना पालकमंत्री जिल्ह्याला वेळ देत नाहीत. फोनवरही ते नागरिकांना उपलब्ध होत नाहीत. अजित पवार यांनी आता त्यांची झोप कमी करून पुण्यात लक्ष द्यायला हवं, अशी मागणीही चंद्रकांत पाटील यांनी केली होती.