औरंगाबाद : शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे हे पराभूत झाल्या पासून पक्षातील त्यांचा वर्चस्व कुठे तरी कमी झाला असल्याची चर्चा ऐकायला मिळतात. आज एका प्रश्नाला उत्तर देताना भाजपचे राज्यसभेचे खासदार डॉ.भागवत कराड यांनी टोला लगावत आता खैरेंना कोण विचारतो अशी खोचक प्रतिक्रिया दिली.त्यामुळे येत्या काळात खैरे आणि कराड अशी शाब्दिक चकमक पाहायला मिळू शकते.
दोन दशकापासून शहरातील खासदार पद भूषविणारे, शिवसेनेचे मात्तबर नेते, अशी ओळख असलेले औरंगाबाद जिल्ह्याचे माजी खासदार चंद्रकांत खैरे हे अनेक वेळा त्यांच्या खुल्या स्वभावामुळे त्यांच्या वक्तव्यमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडले होते.
गेल्या लोकसभा निवडणुकीत एम.आय.एम.चे उमेदवार इम्तियाज जलील यांनी त्यांचा पराभव केला. त्यानंतर पक्षात त्यांचे वजन राहिले नाही, त्यांचा दोन दशकांचा दबदबा आता उरला नाही.अश्या अनेक चर्चा राजकीय वर्तुळात पाहायला मिळत आहे.मात्र खासदार नसतानाही खैरे हे आजही कोरोना काळात अनेक ठिकाणाची पाहणी करताना दिसत आहे. तर सहकार बँकेच्या निवडणुकीत देखील त्यांनी पहिल्यांदा लक्ष घालत यश मिळविले.त्यामुळे अलीकडील काळात ते सक्रिय झाल्याचे देखील पाहायला मिळाले.
कोरोनाच्या परिस्थिती बाबत आज भाजप चे राज्य सभेचे खासदार डॉ.भागवत कराड यांच्याशी हॅलो महाराष्ट्र प्रतिनिधींनी संपर्क साधला असता डॉ.कराड यांनी सरकार कमी पडलंय त्यामुळेच औरंगाबादसह महाराष्ट्रात कोरोना परिस्थिती बिकट होत असल्याची टीका केली.तर एका प्रश्नाला उत्तर देताना शिवसेनेचे नेते माजी खासदार चंद्रकांत खैरे यांना आता कोण विचारतोय? असा टोला लगावला.