हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी भाजप नेते आणि केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. दानवे हे महाराष्ट्र भाजपचे अध्यक्ष असताना त्यांनी मला पाडलं.दानवे यांनी रुग्णालयात बसून पैशांचं वाटप केलं. त्यामुळेच माझा पराभव झाला, असा गौप्यस्फोट चंद्रकांत खैरे यांनी केला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
दानवे हे महाराष्ट्र भाजपचे अध्यक्ष असताना त्यांनी मला पाडलं. हॉस्पिटलमध्ये बसून पैसे वाटप केलं, आमचे नगरसेवक फोडण्याचा प्रयत्न केला. शिवसेनेचे नगरसेवक तेव्हा फुटले नाहीत. मग त्यांनी भाजपच्या १५ नगरसेवकांना फितवलं. त्यांना पैसे देऊन माझ्या विरोधात काम करायला सांगितलं. तत्कालीन मुख्यमंत्र्यांना ही गोष्ट कळल्यानंतर त्यांनी खबरदारी घेतली. मात्र, तरीही अर्ध्या भाजपनं माझ्या विरोधात काम केलं,’ असा आरोप खैरे यांनी केला.
यावेळी त्यांनी भागवत कराड यांच्यावर देखील निशाणा साधला. माझी राजकीय उंची खूप मोठी आहे. शिवसेनाप्रमुखांच्या आशीर्वादानं मी कराड यांना नगरसेवक, महापौर केलं. आता त्यांना मोठं पद मिळालं असेल. पण मी त्यांना खूप सीनियर आहे. ते आजही मला नेता मानतात. त्यामुळं ते येतीलच माझ्याकडं,’ असं खैरे यांनी सांगित