‘या’ शिवसेना नेत्याने केली दिपाली सय्यद यांच्यावर टीका; म्हणाले कि….

dipali sayyed
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद : हॅलो महाराष्ट्र – ठाकरे गटाचे शिवसेना नेते चंद्रकांत खैरे (chandrakant khaire) यांनी अभिनेत्री दिपाली सय्यद यांच्यावर निशाणा साधत जोरदार टीका केली आहे. हि टीका करत असताना त्यांची जीभ घसरली. त्यांनी दिपाली सय्यद यांच्यावर टीका करताना त्यांचा उल्लेख लिपस्टिकवाली बाई असा केला. महाप्रबोधन यात्रेला संबोधित करताना त्यांनी हा उल्लेख केला.

सध्या ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्या नेतृत्वाखाली महाप्रबोधन यात्रा सुरू आहे. हि यात्रा औरंगाबादमध्ये आहे. शिंदे गटाचे आमदार प्रदीप जैस्वाल यांच्या विधानसभा मतदार संघात काल सुषमा अंधारे यांची सभा पार पडली. त्या सभेला चंद्रकात खैरे, मनिषा कायंदे, विनोद घोसाळकर आदी ठाकरे गटाचे नेते उपस्थित होते.

काही दिवसांपूर्वी दिपाली सय्यद यांनी सुषमा अंधारे आणि नीलम गोऱ्हे या चिल्लर नेत्या असल्याचं म्हटलं होतं. त्यावर प्रतिउत्तर देताना चंद्रकांत खैरे (chandrakant khaire) यांनी सय्यद यांच्यावर निशाणा साधला. त्यावेळी त्यांनी आपल्या भाषणात ओघाच्या भरात दिपाली सय्यद यांचा लिपस्टिकवाली बाई असा उल्लेख केला.

हे पण वाचा :
Senior Citizen Saving Scheme च्या व्याजदरात बदल
मुलं चोरणारा समजून नागरिकांकडून तरुणाला बेदम मारहाण, Video आला समोर
Repo Rate वाढल्यामुळे कर्ज महागणार तर FD वर मिळणार जास्त व्याज !!!
मला कुत्रा निशाणी दिली तरी मी निवडून येईल; सत्तारांचे विधान चर्चेत
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी!! UPSC अंतर्गत 253 जागांसाठी भरती