या मतदारसंघातून चंद्रकांत पाटील यांची विधानसभा निवडणूक लढण्यासाठी चाचपणी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कोल्हापूर प्रतिनिधी | कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि भाजप चे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आगामी विधानसभा निवडणूक लढवायचं पक्क केल्याची कोल्हापुरात चर्चा आहे. शिवसेनेशी युती झाल्यास ते ‘कोल्हापूर उत्तर’मधून जनतेचा कौल आजमावतील आणि युती न झाल्यास राधानगरी-भुदरगड मतदारसंघाला त्यांची पसंती राहील, असे बोलले जात आहे.

ही ‘आचार संहिता’ मजी काय असतंय रं लका?

भाजप शिवसेना युतीचा जागावाटपाचा निर्णय अद्याप झालेला नाही. परिणामी दोन्ही पक्षाचे नेते एका बाजूला युती होणारच असल्याची ग्वाही देत असताना दुसऱ्या बाजूला स्वबळाची तयारी सुरूच ठेवली आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आता विधानसभा लढवायचा निर्णय पक्का केला आहे. सध्या शिवसेनेकडे असलेल्या ‘कोल्हापूर उत्तर’ मतदारसंघ चंद्रकांत पाटील यांच्या दृष्टीने अत्यंत सेफ समजला जातो. सध्या हा मतदारसंघ शिवसेनेकडे आहे. राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर या मतदारसंघाचे आमदार आहेत. २०१४ च्या निवडणुकीत भाजप उमेदवार महेश जाधव यांना झालेले ४० हजारांहून अधिक मतदान, या शहरी मतदारांचा भाजपकडे असलेला स्पष्ट कल, मंत्री पदाच्या काळात चंद्रकांत पाटील यांनी असंख्य संस्था, तालीम, मंडळांना केलेली भरघोस मदत, सेवाभावी व मानवतावादी कार्य तसेच असंख्य खेळाडू व क्रीडा संघटनांना केलेली मदत यामुळे चंद्रकांत पाटील व्यक्तिगत स्तरावर ‘उत्तर’मध्ये खूप मोठे गुडविल मिळविले आहे. त्यातच विरोधी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीकडे तगडा उमेदवारच नाही, अशी परिस्थिती आहे. शिवसेनेशी युती झाल्यास विद्यमान आमदार राजेश क्षीरसागर यांना विधानपरिषदेवर संधी देत त्यांना मंत्रीपद देऊन ही जागा चंद्रकांत पाटील यांच्यासाठी सोडवून घेण्याचा प्रयत्न राहील.

उदयनराजेंना मोठा धक्का ; सातारा लोकसभा पोटनिवडणूक विधानसभा निवडणुकीसोबत नाहीच

चंद्रकांतदादा यांचे मूळ गाव भुदरगड तालुक्यातील आहे. त्यातूनच शिवसेनेशी युती न झाल्यास त्यांनी राधानगरी-भुदरगड मतदारसंघातून निवडणूक लढवावी, असा आग्रह होतो आहे.

Leave a Comment