हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गेल्या काही दिवसांपासून शिवसेना आणि भाजपमधील दरी आणखी वाढत चालली आहे. शिवसेना खासदार संजय राऊत आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यात एकमेकांवर टीकास्त्र सोडलं जात आहे. याच दरम्यान राऊतांच्या टिकेला प्रत्युत्तर देताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना टोला लगावला. मी काही उद्धव ठाकरेंसारखा डॉक्टर नाही आणि संजय राऊतांसारखा कंपाउंडर नाही असा टोला चंद्रकांत पाटील यांनी लगावला.
कोरोनाची तिसरी लाट येणार नाही हे भाकीत करण्यासाठी मी काही उद्धव ठाकरेंसारखा डॉक्टर नाही आणि संजय राऊतांसारखा कंपाउंडर नाही. तिसरी लाट येऊ शकते का नाही हे माहीत नाही. पण कोव्हीड फक्त उद्धव ठाकरे यांच्याशी बोलतो माझ्याशी बोलत नाही’, असा खोचक टोला पाटील यांनी लगावला आहे.
दरम्यान, संजय राऊतांनी आम्ही समोरून कोथळा काढतो अशी टीका केल्यावर चंद्रकांत पाटलांनी त्यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे. ‘हम किसीको टोकेंगे नही अगर किसी ने टोका तो छोडेंगे नही’, असा प्रत्युत्तर दिलं आहे. नारायण राणेंनी जेव्हा वक्तव्य केलं तेव्हा त्यांना अटक करण्यात आली आता संजय राऊतांवर मुख्यमंत्री काय कारवाई करणार?, असा सवाल पाटलांनी केला आहे.