शरद पवारांवर फक्त पुस्तक येणं बाकी, वसंतदादांचे काय झालं? चंद्रकांत पाटलांचा सवाल

0
24
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर पाठीत खंजीर खुपसण्याचा आरोप केल्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पवारांनी खंजीर खुपसल्याचे एक उदाहरण दाखवा, मी राजकारण सोडतो अस खुलं आव्हान दिले होते. त्यांवर पुन्हा एकदा चंद्रकांतदादांनी प्रत्युत्तर दिले आहे.

चंद्रकांत पाटील म्हणाले, शरद पवारांवर फक्त पुस्तक येणं बाकी आहे. तरीही ते म्हणतात, खंजीर खूपसलं नाही. पूढे वसंतराव पाटलांच काय झालं? असा प्रश्नही चंद्रकांत पाटील यांनी संजय राऊत यांना विचारला आहे. महाराष्ट्रातील शाळेत आता पवारांनी कोणाकोणाच्या पाठीत खंजीर खुपसला हा धडा शिवकवण्याचे राहिलं आहे. असा टोला चंद्रकांतदादांनी लगावला.

ते पुढे म्हणाले, संजय राऊत हे शरद पवार यांच्यासाठी काम करत असल्याचे उद्धव ठाकरे यांना कळत नाही आहे. शिवसेनेचे कार्यकर्ते देखील राष्ट्रवादीत जात आहेत. राष्ट्रवादी एक एक पंचायत समिती खात आहे तरी उद्धव ठाकरे यांना कळत नसल्याचा आरोप चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here