हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेनेचे कट्टर मानले जाणारे गटनेते एकनाथ शिंदे यांना आमदारांसह उद्धव ठाकरे यांच्या विरोधात बंड करावे लागले. हि सर्व खेळी मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीसाठी फडणवीस करतील, असे मानले जात होते. मात्र, देवेंद्र फडणवीस यांनी तसे न करता एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री म्हणून खुर्चीवर बसवले. तर पक्षादेशानुसार उपमुख्यमंत्री पद स्वीकारले. मात्र त्यांनी मुख्यमंत्रीपद न स्वीकारण्यामागचे खरे कारण भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितले आहे. “आमच्यात अत्यंत सलोख्याची नाती आहेत. पक्षासाठी मान कापून देण्याची तयारी आमच्यात असते. ज्यांना हे जमत नाही, ज्यांना याचा हेवा वाटतो, अशा लोकांनी तयार केलेली ही कथा असून पक्षनिष्ठा हे कारण असल्याचे पाटील यांनी म्हंटले आहे.
चंद्रकांत पाटील यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांच्यातील अंतर्गत कलहामुळे फडणवीसांना मुख्यमंत्रीपद मिळालं नाही, अशी चर्चा ऐकायला मिळत आहे. खरं तर आमच्यात अत्यंत सलोख्याची नाती आहेत. पक्षासाठी मान कापून देण्याची तयारी आमच्यात असते. ज्यांना हे जमत नाही, ज्यांना याचा हेवा वाटतो.
आम्ही हिंदुत्वाला मानणारे आहोत. आणि जे कधी हिंदुत्व मानत नाही, त्यांचा कधी हिंदुत्वाचा एजेंडा देखील नव्हता, त्यांच्या मांडीला मांडी लावून हे बसले होते. सुरुवातीला त्यांनी महाशिवआघाडी नाव ठेवले होते. त्याचेच पुढे महाविकास आघाडी कधी झाले हे कळलं देखील नाही,असेही पाटील यांनी म्हंटले. चंद्रकांत पाटील यांनी फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपद नाकारल्याचे खरे कारण सांगितले जरी असले तरी फडणवी यांच्या मनात नेमकं काय चाललं आहे, हे कळणे सध्या मुश्किलीचे आहे.