हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्र सरकारने नुकतीच अग्निपथ योजनेची घोषणा केली. या योजनेवरून देशभरात तरुणांकडून आक्रमक पावित्रा घेत आंदोलन केले जात आहे. दरम्यान या आंदोलन करणाऱ्या तरुणांना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी थेट इशाराच दिला आहे. अग्निपथ योजनेविरोधात तरुणांनॊ आंदोलन करताय. पण एक गोष्ट लक्षात घ्या कि या योजनेविरोधात तुम्ही आंदोलने केल्यास अशा केसेस तुमच्यावर दाखल होतील कि तुम्हाला नोकरीही मिळणार नाही. ही धमकी नाही तर वस्तुस्थिती आहे, असा इशारा चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे.
चंद्रकांत पाटील यांनी आज माध्यमांशी संवाद साधला.या यावेळी त्यांनी थेट अग्निपथ योजनेवरून देशभरात केल्या जात असलेल्या तरुणांना सूचक इशारा दिला. ते म्हणाले की, योजनेच्या अनुशंगाने काही सूचना आणि त्रुटी असतील तर त्या दुरुस्त केल्या जातील. मात्र काहीही मागण्या न करता थेट आंदोलन करणे, रेल्वे जाळणे चुकीचे आहे. आंदोलने अनेक होतात. पण काहीही मागण्या पुढे न करता थेट आंदोलने करणे हे किती योग्य आहे.
प्रदेशाध्यक्ष श्री. चंद्रकांतदादा पाटील यांचा पत्रकारांशी संवाद. https://t.co/O5HABbIsQO
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) June 18, 2022
सामान्य युवक हा आंदोलन करण्याचे धाडस करत नाही. यातून केसेस दाखल झाल्या तर त्याचे नोकरीचे सर्व मार्गच बंद होतात. त्यामुळे आंदोलनातला हा सामान्य तरुण नाही. त्यामुळे अग्नीपथ योजना काय आहे, हे तरुणांनी आधी समजून घ्यावी ती मान्य नसेल तर शांततामय मार्गाने चर्चा केली पाहिजे. आंदोलनाच्या मार्गाने तुम्ही तुमच्या पायावर कुऱ्हाड पाडून घेत आहात. तुमच्यावर केसेस दाखल होतील. कुठलीही नोकरी मिळणार नाही. मी भीती दाखवत नाही. मीही चळवळीत काम केलेले आहे, असे पाटील यांनी सांगितले.