हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजपने सध्या देशात इतर पक्षांच्या निवडणुकीत तुलनेत चांगले यश मिळवले आहे. भाजपची स्थापना हि 1951 मध्ये झाल्याची बोलले जाते. मात्र, या स्थापनेवरून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी हिंदुत्वाच्या मुद्यांवरून अजब विधान केले आहे. “भाजपा हा काही 1951 साली स्थापन झालेला पक्ष नसून त्याला पाच हजार वर्षांचा इतिहास आहे.
पुण्यात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत शांतनू गुप्ता लिखित व मल्हार पांडे यांनी मराठीत अनुवाद केलेल्या ग्रंथाचा प्रकाशन कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमप्रसंगी यावेळी चंद्रकांत पाटील यांनी अजब विधान केले. यावेळी ते म्हणाले की, भाजप पक्षाबद्दल सध्या कहाणी लोकांच्या मनात अज्ञान आहे. मात्र, त्यांना सांगू इच्छितो की, भाजपला 5 हजार वर्षाच्या हिंदुत्वाचा इतिहास लाभलेला आहे.
भाजपा : काल आज आणि उद्या या शांतनू गुप्ता लिखित व मल्हार पांडे यांनी मराठीत अनुवाद केलेल्या ग्रंथाचे प्रकाशन महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते @Dev_Fadnavis यांच्या हस्ते झाले. सर्वे भवन्तु सुखिन: हे भगव्याचे विचार नव्या पीढित रुजवण्यासाठी हा ग्रंथ नक्की उपयोगी ठरेल. #BJP pic.twitter.com/ocreusx2On
— Chandrakant Patil (@ChDadaPatil) April 19, 2022
या भाजप पक्षाला मोठा वसा आहे, या पक्षाला हात लावता येणार नाही हे माहिती आहे. आम्ही केवळ 1951 साली स्थापन झालेलो नाही आहोत. आम्ही केवळ 1925 साली स्थापन झालेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून प्रेरणा घेऊन स्थापन झालेले नाही आहोत. आमची परंपरा पाच हजार वर्षांची आहे. हा पक्ष 80 साली स्थापन झाला असे समजणारे खूप महाभाग आहेत ज्यांना टीव्हीवर रोज कव्हरेज मिळते,” असा टोला चंद्रकांत पाटील यांनी संजय राऊत यांना अप्रत्यक्षपणे लगावला.