हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजप नेते तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना पाठवण्यात आलेल्या नोटीनंतर सागर बंगल्यात अर्ध्या तासापासून त्यांची चौकशीकेली जात आहे. यावरून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महत्वाचे असे विधान केले आहे. “फडणवीसांनी नुकताच विधानसभेत एक बॉम्ब टाकला आहे. त्यामुळे त्याची आज चौकशी सुरु करण्यात आली आहे. मुळात हि चौकशीच चुकीची आहे. आता यानंतर फडणवीस उद्या पुन्हा दुसरा आणखी एक व्हिडीओ बॉम्ब टाकणार आहेत. त्याच्या बॉम्बमध्ये आणखी काही गोष्टी पहायला मिळतील, असे पाटील यांनी म्हंटले.
चंद्रकांत पाटील यांनी आज मुंबईत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांना काल नोटीस बजावण्यात आल्यानंतर आज त्यांची चौकशी केली जात आहे. केंद्रीय यंत्रणांचा कुठेही गौरवापर केला जात नाही. अनिल देशमुखांना जामीन मिळाला नाही म्हणून ते तुरुंगात आहेत, असे पाटील यांनी यावेळी म्हंटले.