शरद पवारांच्या घरातील एक हि माणूस लोकसभेतत जाणार नाही : चंद्रकांत पाटील

Untitled design
Untitled design
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव प्रतिनिधी | शरद पवारांच्या घरातील एकही व्यक्ती लोकसभेत निवडून जाणार नाहीत त्यामुळे ते पराभवाची करणे लिहू लागले आहेत. शरद पवारांनी ईव्हीएम मशीनवर घेतलेला संशय आणि त्या संदर्भात केलेले विधान त्यावर चंद्रकांत पाटील यांनी शरद पवारांचा चांगलाच खरपूस समाचार घेतला आहे.

धक्कादायक! सुप्रिया सुळेंच्या पराभवावर शरद पवारांनी सुद्धा केले ‘हे’ विधान

शरद पवारांच्या घरातील एक हि व्यक्ती लोकसभेला निवडून जाणार नाही त्यामुळे शरद पवार पराभवाची कारणे लिहू लागले आहेत. आम्ही तीन राज्यांत पराभव झाल्यावर तो जनादेश मानून स्वीकारला. तसा शरद पवारांनीही जनतेने बारामतीत पराभव केल्यास स्वीकारावा असे चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.

सुप्रिया सुळेंना इंदापूरात आघाडी मिळण्याची शक्यता धूसरच ? तर खडकवासल्यात मिळू शकते निर्णायक पिछाडी

ज्यांनी कधीच सार्वत्रिक निवडणुका लढवल्या नाहीत ते बारामती जिंकण्याचा दावा करत आहेत. हा दावा ईव्हीएम मशीन मध्ये छेडछाड करण्यावर आधारित असावा असे शरद पवार एका वृत्त वहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले होते. त्यांच्या याच विधानाला चंद्रकांत पाटील यांनी उत्तर दिले आहे.