हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या विधान परिषदेच्या निवडणुकीवरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या निवडणुकीत आमदार फुटू नये यासाठी भाजपने त्यांच्या आमदारांची व महाविकास आघाडीनेही त्यांच्या आमदारांची एका हॉटेलमध्ये व्यवस्था केली आहे. दोन्ही पक्षांकडून आपणच निवडणुक जिंकणार असा दावा केला जात असल्यामुळे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज महत्वाचे विधान केले. विधान परिषद निवडणुकीत भाजपला मोठे यश मिळणार असून महाविकास आघाडीतील एकाची विकेट पडेल, असे पाटील यांनी म्हंटले आहे.
चंद्रकांत पाटील यांनी आज पत्रकार परिषद घेत माध्यमांशी संवाद साधला.या यावेळी ते म्हणाले की, राज्यसभेप्रमाणे विधान परिषद निवडणुकीतही भाजपला मोठे यश मिळणार आहे. या निवडणुकीत कोणाची विकेट पडेल हे त्या दिवशी समजेल. राज्यसभेला देखील भाजपा 11 मते हवे होती, मात्र आम्ही चमत्कार करुन दाखवला. त्यामुळे त्यांना मते मिळू शकली नाही.
प्रदेशाध्यक्ष श्री. चंद्रकांतदादा पाटील यांचा पत्रकारांशी संवाद. https://t.co/O5HABbIsQO
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) June 18, 2022
यावेळी पाटील यांनी शैवसेना खासदार संजय राऊत यांच्यावरही निशाणा साधला. ते म्हणाले की, संजय राऊत राज्यसभेच्या निवडणुकीनंतर अपक्षांवर भडकले. वास्तविक पाहता सांगायचे झाले तर राऊत अपक्षांना घरगडी समजत आहेत. राऊतांना त्यांचे उत्तर या निवडणुकीतून नक्की मिळेल, असा टोला पाटील यांनी लगावला.
झोपेचे सोंग घेतलेल्या जाग करता येत नाही
देशात कंत्राटी पद्धतीने सैन्यभरतीवर वणवा पेटला आहे. यावर ते म्हणाले, आंदोलन करायला हरकत नाही फक्त ते लोकशाही मार्गाने व्हायला हवे. अग्निपथ योजना काय ते तरुणांनी समजून घ्यायला हवे. तुम्ही तुमच्या पायावर कुऱ्हाड मारून घेऊ नका. झोपेचे सोंग घेतलेल्या जाग करता येत नाही, असा टोला चंद्रकांत पाटील यांनी विरोधकांना लगावला आहे.