हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपकडून भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे व सदाभाऊ खोत यांच्या ऐवजी प्रविण दरेकर, प्रसाद लाड, उमा खापरे, राम शिंदे, श्रीकांत भारतीय यांना उमेदवारी देण्यात आली. मुंडे यांच्या उमेदवारीबाबात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महत्वाचे विधान केले. “पंकजा मुंडे यांना उमेदवाराची मिळावी म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्यासह आम्ही सर्वांनी खूप प्रयत्न केले. परंतु केंद्राने काही भविष्यातील विचार केला असेल. पंकजा मुंडे या अगोदरच मध्यप्रदेशच्या सहप्रभारी आहेत. त्यामुळे केंद्राकडून आणखी कहाणी जबाबदारी टाकण्याची कल्पना त्यांच्या मनात असेल म्हणून त्यांनी उमेदवारी दिली नसेल, चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले.
चंद्रकांत पाटील यांनी मुंबईत आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, आमच्या पक्षात सर्वजण कोरी पाकिटे असतो. जो पत्ता लिहिल तेथे जात असतो. आणि त्यामुळे राजकारणामध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्याने त्याच्या चाहत्याने इच्छा व्यक्त करायची असते. पण निर्णय हा शेवटी संघटना करते. आणि प्रामुख्याने विधानसभा, राज्यसभा आणि लोकसभेचे निर्णय हे केंद्र घेत असतो आणि केंद्राने दिलेला निर्णय हा शिस्तबद्ध असतो. तो सर्वांनी मान्य करायचा असतो.
भाजपच्या केंद्रातील वरिष्ठांकडून राज्यसभेनंतर आता विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी आज पाच जणांच्या नावांवर शिकामोर्तब करण्यात आला. विधान परिषदेच्या १० जागांसाठी येत्या 20 जून रोजी निवडणूक पार पडणार आहे. याकरिता उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत 8 जून ही आहे. आज भाजपतर्फे उमेदवारांची नावे निश्चित करण्यात आल्यानंतर संबंधित उमेदवार आज आपले उमेदवारी अर्ज आज दाखल करणार आहेत.
पंकजा मुंडे काय भूमिका घेणार?
परळी येथील बीडमध्ये गोपीनाथ मुंडे यांचा स्मृतीदिनाचा कार्यक्रम नुकताच पार पडला. यावेळी भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी गोपीनाथ गडावरून विधान परिषदेच्या उमेदवारीविषयी मोठे विधान केले होते. संधीसाठी रांगेत वाट पाहणं, ही माझी प्रवृत्ती नाही. मी कोणत्याही संधीची अपेक्षा करत नाही किंवा त्यासाठी प्रयत्नही करत नाही. पण विधानपरिषदेची संधी मिळाल्यास त्याचं सोनं करून दाखवू,असे मुंडे यांनी म्हंटले होते. आता त्यांचे नाव उमेदवारी यादीत नसल्यामुळे त्या नक्की काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.