Wednesday, June 7, 2023

शाईफेकीनंतर चंद्रकांत पाटलांची पहिली प्रतिक्रिया; हिंमत असेल तर…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महात्मा फुले, डॉ. आंबेडकर आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शाळा उभारताना लोकांकडे भीक मागितली, असे वादग्रस्त वक्तव्य भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी केलं होत. त्यांच्या या विधानानंतर चंद्रकांत पाटलांवर पुण्यात शाईफेक करण्यात आली. या शाईफेकीननंतर हिंमत असेल तर समोर या असं आव्हान चंद्रकांत पाटलांनी विरोधकांना दिले आहे. तसेच महाराष्ट्रात ही झुंडशाही चालणार नाही असेही ते म्हणाले.

प्रसारमाध्यमांशी बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, मी चळवळीतील माणूस आहे, कोणाला मी घाबरत नाही. हिंमत असेल तर समोर या महाराष्ट्र शासन झुंडशाही सहन करणार नाही. आम्ही सुद्धा आमच्या कार्यकर्त्यांना खुली सूट दिली असत तर केवढ्याला पडलं असत ? पण ही आमची संस्कृती नाही, शब्दाला शब्दाने टक्कर देता येते असेही ते म्हणाले.

खरं ते एक गिरणी कामगाराचा मुलगा या स्टेजपर्यंत पोचला आहे हे त्या सरंजामशाहीच्या लोकांना झेपत नाही त्यामुळे माझ्यावर भ्याड हल्ले चालले आहेत. मात्र कार्यकर्त्यांनी माझ्यावरील हल्ल्यांनंतर कायदा हातात घेऊ नये असं आवाहन चंद्रकांत पाटील यांनी केलं. मी लढणार माणूस आहे, रडणारा नाही. मात्र विरोधक या झुंडशाहीचा निषेध करणार का? असं म्हणत त्यांनी अजित पवार, शरद पवार, उद्धव ठाकरे याना सवाल केला.

नेमकं काय घडलं –

पिंपरी-चिंचवडमध्ये मोरया गोसावी महोत्सवासाठी आज चंद्रकांत पाटील पिंपरी चिंचवडमध्ये आले होते. त्यावेळी ते आपल्या एका कार्यकर्त्याच्या घरी थांबले होते. कार्यकर्त्याच्या घरून निघाल्यानंतर चंद्रकांत पाटील यांच्या चेहऱ्यावर शाईफेक करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी ३ जणांना ताब्यात घेतलं.