हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | हिवाळी अधिवेशनातील मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या अनुपस्थीमुळे सत्ताधारी आणि विरोधी पक्ष भाजपमध्ये टीका टिपण्णी होत आहे, याच वरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी आपला बाप आजारी असताना आपण आपल्या बापाबद्दल चर्चा करतो का असा सवाल केल्यानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पलटवार केला आहे. दुसऱ्याचा बाप काढण्याची आव्हाडांची संस्कृती आहे अशी टीका त्यांनी केली
चंद्रकांत पाटील म्हणाले, मुख्यमंत्र्यांची बाजू मांडतांना जितेंद्र आव्हाड यांनी माझा बाप काढला. दुसऱ्याचा बाप काढणं ही आव्हाडांची संस्कृती आहे. माझा बाप काढून आव्हाडांना काय मिळणार? असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री पदाचा चार्ज दुसऱ्याकडे देत नाहीत, कारण त्यांना भीती वाटते. जर राष्ट्रवादी काँग्रेसला केलं तर ते महाराष्ट्र विकून टाकतील, असा टोलाही पाटील यांनी लगावला.
जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले –
विरोधी पक्षाने मागण्या करणं, आंदोलन करणं, टीका करणं हे स्वाभाविक आहे. पण कोणाच्या तरी आजारपणावर टीका करणं हे राजकीय प्रगल्भता नसल्याचं उदाहरण आहे. आपला बाप आजारी असताना आपण आपल्या बापाबद्दल चर्चा करतो काय? आपली ती संस्कृती आहे का? आजारपण हे नैसर्गिक आहे. त्यामुळे आजारपणाची चर्चा करणं हेच मुळात विकृतपणाचं, बालिशपणाचं लक्षण आहे, असे जितेंद्र आव्हाड यांनी म्हंटल