कोल्हापूर प्रतिनिधी | सरकारराने ऑक्टोम्बरपासूनच दुष्काळी उपाययोजना हाती घेतल्या असून पवार माहिती न घेता दुष्काळाचे राजकारण करत असल्याची टीका महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलीय. दुष्काळी उपाययोजनाबाबत शरद पवारांनी सरकारवर केलेल्या आरोपाला महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यानी आज उत्तर दिलंय.
पवारांच्या माहिती न घेता बोलण्याची चिंता वाटत असल्याच त्यांनी म्हंटलय.तर सगळ्यांनी मिळून दुष्काळाचा सामना करण्याची गरज त्यांनी व्यक्त करताना पवारांच्या सूचनांचेही स्वागत केले जाईल असे चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलंय.शरद पवारांसोबत राज ठाकरेंवरही त्यांनी टीका करताना सोशल मीडियावरून पोस्ट केले म्हणून मराहण करण्याची त्यांची पद्धत चुकीची असल्याची टीका केलीय.तर बाळासाहेबांचा आदर्श घेऊन चालणारे राज ठाकरे बाळासाहेबांनी कधीही मदत न केलेल्या काँग्रेसच्या बाजूने जात कसे काय जात आहेत असा सवाल त्यांनी केलाय.
मंत्रालयाच्या पायऱ्या आघाडी सरकारने बांधल्या होत्या मात्र त्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अडचणीच्या असल्याचा गृहविभागाने आणि त्रिसदस्यीय आयएएस अधिकाऱ्यांच्या समितीने अहवाल दिल्याने हटवण्यात येत असल्याचे स्पष्टीकरण दादांनी यावेळी दिले.