हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यातील शाब्दिक चकमक अजूनही सुरूच आहे. संजय राऊतांनी चंद्रकांत पाटलांना मानसिक स्वास्थ्य नीट करण्याचा सल्ला दिल्यानंतर आता चंद्रकांतदादांनी देखील राऊतांवर पलटवार करत संजय राऊत यांना अल्झायमर झाला आहे असा टोला लगावला.
चंद्रकांत पाटील म्हणाले, ‘खोटं बोल पण रेटून बोल.. सकाळी एक बोलायचं दुपारी एक. त्यांना बहुतेक अल्झायमर सुरु झाल्याचं दिसतंय. त्यामुळे दुपारी लक्षातच राहत नाही सकाळी काय बोललो. ते क्लिअर कट अस म्हणाले की आम्ही पाठीत खंजीर खुपसत नाही तर कोथळाच काढतो. ते पोलीस बघतील असे चंद्रकांत पाटील यांनी म्हंटल.
ते पुढे म्हणाले, पोलीस त्यांच्या दबावाखाली काम करत असल्यामुळे ते काय करतील माहिती नाही. पण आमच्या पुण्याच्या अध्यक्षांनी तर तक्रार दाखल केली आहे,’ असं म्हणत चंद्रकांत पाटील यांनी संजय राऊतांवर पुन्हा निशाणा साधला.