हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : राज्यात महाविकास आघाडी सरकार फारकाळ टिकणार नाही. तर शिवसेना पक्षाला आजही आमचे मित्र मानतो असे भाजप सुरवातीपासून सांगत आली आहे. सध्या गाजत असलेल्या शिवसेना आमदार संजय राठोड यांचे प्रकरण व महाविकास आघाडीतील धुसफूस यावरून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मोठं विधान केलं आहे. शिवसेना पक्षातील आमदार संजय राठोड हे आमचे दुष्मन नसून शिवसेना तर बिलकुल नाही, असे पाटील यांनी म्हंटल आहे.
शिवसेना पक्ष व राठोड यांच्यावरील कारवाईबाबत बोलताना पाटील म्हणाले कि, राठोड यांना पोलिसांकडून क्लिनचिट देणे हि गोष्ट खूप चिंताजनक आहेअसे म्हणावे लागेल. राठोडांचे प्रकरण न्यायलय व पोलीस यांच्याकडून हाताळले जात आहे. त्यामुळे त्यांना राज्य मंत्रिमंडळात पुन्हा घ्यावे कि नाही हा शिवसेनेचा विषय आहे. मात्र, एक गोष्ट स्पष्ट करतो कि, आमचे दुष्मन संजय राठोडही नाहीत आणि ते ज्या पक्षात आहेत तो शिवसेना पक्ष तर बिलकुल नाही, असे पाटील यांनी म्हटले आहे.
पुणे येथील पूजा चव्हाण या मुलीला आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकरणी शिवसेनेचे नेते संजय राठोड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. आहे. दरम्यान आज राठोड यांना क्लीनचिट देण्यात आल्याचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर भाजप नेत्या वाघ यांनी पत्रकार परिषद घेत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. तर या प्रकरणी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनीही खुलासाही केला आहे.