मी फेकलेली टोपी विश्वजीत कदमांना लागली : चंद्रकांत पाटील

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कोल्हापूर प्रतिनिधी | भाजपचे नवनिर्वाचित प्रदेशध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी काल तुळजापूर येथे काँग्रेसचे कार्याध्यक्ष विश्वजीत कदम यांच्यावर एक भाकीत केले होते. त्यावर विश्वजीत कदम यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका केली होती. त्यावर चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा एकदा विश्वजीत कदम यांना घेरण्याचा प्रयत्न केला आहे.

लोकसभेत कर्जमाफीची चर्चा सुरु असताना मुंडे, खडसेंना आले हसू ; सोशल मीडियात झाल्या ट्रोल

चंद्रकांत पाटील यांनी तुळजापूर येथे पार पडलेल्या पत्रकार परिषदेत काँग्रेसच्या ५ कार्याध्यक्ष नेमण्याच्या धोरणावर टीका केली आहे. त्यांच्यात गटबाजी उफाळली आहे त्यामुळे ते असे करत आहेत. त्यामुळे भवितव्य नसणारे काँग्रेसचे नेते भाजपमध्ये दाखल होऊ लागले आहेत. म्हणून काँग्रेसचा एक कार्यध्यक्ष भाजपमध्ये आला तर नवल मानू नये असे चंद्रकांत पाटील तुळजापुरात म्हणाले होते. त्यावर विश्वजीत कदम यांनी चंद्रकांत पाटील यांच्या भाकितावर भाष्य केले होते. चंद्रकांत पाटील यांचे विधान हास्यास्पद आहे. पाटील हे भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री आहेत. ते असे विधान का करतात हे त्यांनाच माहित आहे अशी प्रतिक्रिया विश्वजीत कदम यांनी दिली होती. त्यावर आज चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा विश्वजीत कदम यांना पुन्हा घेरले आहे.

वंचित स्वबळावरच ! या तारखेला जाहीर होणार पहिली यादी

कोल्हापूर येथे दसरा चौकात भाजपच्या कार्यकर्त्याच्या वतीने चंद्रकांत पाटील यांचा प्रदेशाध्यक्ष पदी निवड झाल्या बद्दल सत्कार आयोजित करण्यात आला होता. त्याप्रसंगी बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, मी विश्वजीत कदम यांच्याकडे टोपी फेकली होती. ती त्यांना एवढ्या अचूक लागली कि त्यांनी माझ्यावर टीका केली असे चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.

बहुमत चाचणी आधीच कुमार स्वामींनी गुडघे टेकले ; कर्नाटकात भाजपा सरकार स्थापनेचा मार्ग मोकळा