चंद्रपूर : हॅलो महाराष्ट्र – चंद्रपूर जिल्ह्यात एक भीषण अपघात (accident) झाल्याची घटना उघडकीस आली आहे. रस्त्यात मध्येच आलेल्या गायीचा जीव वाचवण्याच्या प्रयत्नात हा अपघात (accident) झाला आहे. गायीचा जीव वाचवण्याच्या नादात गाडीच्या स्टेअरिंगचा रॉड तुटला आणि हा अपघात झाला. भरधाव बोलेरो ट्रकवर जाऊन आदळली. हा अपघात (accident) एवढा भयंकर होता की बोलेरो गाडीचा अक्षरशः चुराडा झाला आहे.
ही हृदयद्रावक घटना चंद्रपूर जिल्ह्यातील सावली- गडचिरोली मार्गावर (accident) घडली आहे. यामध्ये चौघांचा जागीच मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये प्रसिद्ध डीजे वादक पंकज बागडे याचाही समावेश आहे. चंद्रपूरहून डीजेसाठी आवश्यक असलेलं सामान घेऊन पंकज आणि त्याच्यासोबत बाकी तरुण निघाले होते. गडचिरोलीला जात असताना रस्त्यात रात्री गाय मध्येच आली. तिला वाचवण्याचा प्रयत्न करत असताना कार ट्रकवर (accident) आदळली.
यानंतर स्थानिक लोकांनी या अपघाताची माहिती पोलिसांना दिली. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमींना (accident) रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. आपल्या डीजेतून कमी कालवधीत प्रसिद्धी मिळवलेल्या पंकजचा अपघाती (accident) मृत्यू झाल्याने सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे. या अपघातातून (accident) एक जण थोडक्यात बचावला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पंकज किशोर बागडे, अनुप रमेश ताडूलवार, महेश्ववरी अनुप ताडूलवार, मनोज अजय तीर्थगिरीवार अशी या अपघातात मृत पावलेल्या व्यक्तींची नावे आहेत. पोलीस या अपघाताचा पुढील तपास करत आहेत.
हे पण वाचा :
महाराष्ट्र नाही तर आता ‘या’ राज्यात मिळेल महाग पेट्रोल
शिंदे- फडणवीसांचा पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीत मास्टरस्ट्रोक : घेतले ‘हे’ 9 महत्वाचे निर्णय
Corona चा नवीन BA.5 व्हेरिएन्ट आधीपेक्षा जास्त घातक आहे ???
सध्याच्या जोखमीच्या काळात सोन्यामध्ये गुंतवणूक करावी की नाही ???