व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

दोन ट्रकची धडक होऊन चंद्रपूर शहराजवळ भीषण अपघात

चंद्रपूर : हॅलो महाराष्ट्र – दोन ट्रकची धडक होऊन चंद्रपूर शहरालगत मूल मार्गावरच्या अजयपूर गावाजवळ भीषण अपघात (Accident) झाला आहे. या अपघातानंतर मोठी आग लागली. आग लागल्यामुळे ट्रकचे टायर फुटून ती आग अजूनच भडकली. या अपघातात (Accident) दोन्ही ट्रकच्या चालक-वाहकाचे काय झालं, हे अद्याप समजू शकलेले नाही. हि आग संपूर्ण रस्ताभर पसरल्यामुळे वाहतूक काही काळ खंडित करण्यात आली होती. त्यामुळे महामार्गाच्या दोन्ही बाजूस वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. या आगीमुळे लगतच्या जंगलातील झाडेही आगीच्या विळख्यात सापडली.

काय घडले नेमके ?
चंद्रपूर शहरालगत मूल मार्गावरच्या अजयपूर गावाजवळ 2 ट्रकमध्ये भीषण अपघात (Accident) झाला. या अपघातानंतर भीषण आग लागली आहे. आग लागल्याने ट्रकचे टायर फुटून ही आग लागली आहे. संपूर्ण रस्ताभर आग पसरल्याने रस्त्यावरील दोन्ही बाजूंची वाहतूक खंडित झाली होती.

आगीच्या उंच ज्वाळानी बाजूच्या जंगलातील झाडेही आगीच्या विळख्यात सापडली आहेत. मूल-चंद्रपूर येथून घटनास्थळी अग्निशमन पथके रवाना करण्यात आली असून मूल-रामनगर पोलिसांची पथके घटनास्थळी दाखल करण्यात आली आहेत.

हे पण वाचा :

तुम्हाला नवाबभाई चालतात पण मुन्नाभाई चालत नाहीत…; राणेंचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल

तुमचा नगरसेवक असलेल्या एखाद्या वॉर्डात फिरुन दाखवा; खासदार जलील यांचे फडणवीसांना आव्हान

केतकी चितळेचा अभिमान वाटतो ; सदाभाऊ खोत यांचे केतकीला समर्थन

वैफल्यग्रस्त विरोधी पक्ष नेत्यांना ब्रेक लागणे कठीण, अपघात अटळ आहे; फडणवीसांच्या सभेनंतर राऊतांचे ट्विट

उद्धवजी, तुमच्या सत्तेचा बाबरी ढाचा मी खाली पाडणार; देवेंद्र फडणवीसांचा करारा जवाब