2024 मध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार?; भाजप नेत्याचं मोठं विधान

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात एकनाथ शिंदे यांच्यासह त्याच्या आमदारांना सोबत घेत भाजपने सत्ता स्थापन केली. सत्ता स्थापनेनंतर मुख्यमंत्रीपद एकनाथ शिंदे यांना तर उपमुख्यमंत्रीपद देवेंद्र फडणवीस यांना संधी देण्यात आली. मात्र, शिंदेंचे मुख्यमंत्रीपद भाजपला खुपत असल्याचे एकंदरीत दिसून आले आहे. कारण नागपुरात कार्यक्रमात एका भाजप नेत्याने 2024 मध्ये देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असल्याचे पाहायचे असल्याचे म्हंटले आहे.

नागपुरात संत संताजी जगनाडे महाराज यांच्या स्मारक आणि आर्ट गॅलरीचा भूमिपूजन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत मोठे विधान केले. “न्यायासाठी आलेल्या प्रत्येकाला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जातीपातीच्या बाहेर निघालेले नेते आहेत. मराठा असतील, धनगर असतील, ओबीसी असतील, सर्वांसाठी त्यांनी काम केलं. त्यामुळे आपली सर्वांची जबाबदारी आहे पुन्हा एकदा 2014 ते 2019 चा काळ महाराष्ट्रात आला पाहिजे. त्यासाठी आपण सर्व समाजातील लोकांनी देवेंद्र फडणवीस यांच्या मागे उभे राहिले पाहिजे.

फडणवीस यांनी कधीही आपल्याकडून अपेक्षा व्यक्त केली नाही, की अमक्या समाजाने माझ्यासाठी हे करावं. देवेंद्र फडणवीस यांना फक्त पदावर बसवण्यासाठी नाही तर सर्व समाजाला न्याय मिळण्यासाठी आता आपली जबाबदारी वाढली असल्याचे बावनकुळे यांनी म्हंटले आहे.