कर्नाटक : वृत्तसंस्था – ‘सरल वास्तू’ने स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या चंद्रशेखर गुरुजींची (chandrasekhar guruji) चाकूने भोसकून हत्या केली आहे. हि घटना हुबळी येथील एका हॉटेलमध्ये घडली आहे. या घटनेमुळे कर्नाटकात मोठी खळबळ उडाली आहे. हि हत्येची संपूर्ण घटना हॉटेलमधील रिसेप्शनजवळील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. आरोपींनी गुरुजींवर (chandrasekhar guruji) चार वेळा वार केल्याचे सीसीटीव्हीत दिसत आहे. हि हत्या केल्यानंतर आरोपी घटनास्थवरून फरार झाले आहेत. पोलीस या सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या आधारे फरार आरोपींचा शोध घेत आहेत. या हत्येनंतर हॉटेलमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
कंत्राटदार म्हणून काम सुरू केले
वास्तु विशारद चंद्रशेखर गुरुजींनी (chandrasekhar guruji) कंत्राटदार म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली. त्यानंतर ते मुंबईत नोकरीला लागले. पुढे चंद्रशेखर (chandrasekhar guruji) यांनी वास्तूचे काम सुरू केले. आज हुबळी काही कामानिमित्त ते आले होते. यावेळी हुबळी येथील एका हॉटेलमध्ये दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास ते बसले होते. याच दरम्यान अनुयायी म्हणून असलेल्या दोन व्यक्तींनी गुरुजींवर (chandrasekhar guruji) हल्ला केला आणि घटनास्थळावरून फरार झाले. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
कर्नाटकात ‘सरल वास्तु’ फेम चंद्रशेखर गुरुजींची हत्या, घटना CCTVमध्ये कैद pic.twitter.com/J1mg0n0wxj
— Ajay Rajaram Ubhe (@RajaramUbhe) July 5, 2022
आरोपींच्या शोधासाठी श्वान पथकाची मदत
चंद्रशेखर गुरुजींच्या (chandrasekhar guruji) मारेकर्यांपर्यंत पोहोचण्यासाठी पोलीस श्वानांचीही मदत घेत आहेत. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी KIMS रुग्णालयात पाठवला आहे. तसेच गुरुजींच्या कुटुंबीयांनाही घटनेची माहिती देण्यात आली आहे. पोलीस सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध घेत आहेत.
हे पण वाचा :
तत्काळ तिकीट बुकिंगद्वारे अशा प्रकारे मिळवा कन्फर्म सीट !!!
ED ची छापेमारी : ‘Vivo’सह भारतातील 44 कंपनीवर धडक कारवाई
मुख्यमंत्री शिंदेंच्या घरातील भिंतीवर अजूनही ठाकरेच; फोटोंनी वेधलं लक्ष्य
शेअर मार्केट मध्ये Pump and Dump द्वारे अशा प्रकारे केली जाते फसवणूक !!!
मुख्यमंत्री शिंदेंच्या घरातील भिंतीवर अजूनही ठाकरेंचं; फोटोंनी वेधलं लक्ष्य