उद्धव ठाकरे- चंद्रशेखर राव यांची संयुक्त पत्रकार परिषद; भाजपवर हल्लाबोल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी आज राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी दोन्ही नेत्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी भाजपवर घणाघात केला. देशात सुडाचे राजकारण चालले असून राजकारण गढूळ बनत असल्याचं दोन्ही मुख्यमंत्र्यांनी म्हंटल.

यावेळी चंद्रशेखर राव म्हणाले, उद्धव ठाकरे यांना भेटून प्रसन्न वाटले. आमच्यात देशाच्या राजकारणाविषयी चर्चा झाली. बिगर एनडीए मुख्यमंत्री लवकरच भेटणार असल्याचं के. चंद्रशेखर राव यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. यावेळी त्यांनी बाळासाहेब ठाकरे आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा विशेष उल्लेख केला. शिवाजी महाराज, बाळासाहेब ठाकरे आणि मराठा योद्ध्यांकडून देशाला खूप प्रेरणा मिळाली. त्याच प्रेरणेवर आम्हाला वाटचाल करायची आहे. आम्हाला अन्यायाविरुद्ध लढायचं आहे. अनैतिक गोष्टींविरुद्ध आम्हाला लढायचं आहे. आमच्या दोघांमध्ये आज जी चर्चा झाली त्याचा पुढील काही काळातच खूप चांगला परिणाम पाहायला मिळेल.”

यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपवर हल्लाबोल केला. देशात सूडाचं राजकारण वाढत आहे. ही आपल्या देशाची हिंदुत्वाची संस्कृती नाही. हे असंच सुरु राहिलं तर देशाला भविष्य काय? असा सवाल त्यांनी केला. महाराष्ट्र आणि तेलंगना सख्खे शेजारी आहेत. राज्या राज्यात एक आपुलकीचं नातं राहिलं पाहिजे. नवी सुरुवात आज झालीय. त्याला आकार येण्यास वेळ लागेल. पण प्रयत्न तर केले पाहिजेत असे त्यांनी म्हंटल.

Leave a Comment