हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गेल्या 23 ऑगस्ट रोजी भारताचे चंद्रयान 3 (Chandrayaan-3) मोहीम यशस्वी झाली आहे. त्यामुळे आता संपूर्ण देशात इस्रो (ISRO) टीमचे कौतुक करण्यात येत आहे. महत्त्वाचे म्हणजे, चंद्रावरील पाण्याचा आणि तापमानाचा अभ्यास करण्यासाठी इस्रोकडून चंद्रयान 3 मोहीम राबविण्यात आली आहे. आता मोहीमेअंतर्गत चंद्रावर पाठवण्यात आलेल्या यानाने चंद्राच्या तापमानाची मोठी माहिती इस्रोला पाठवली आहे. या माहितीत, चंद्राच्या गोलार्धावर 70 डिग्री सेल्सिअस तापमान असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे याबाबत शास्त्रज्ञांकडून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
चंद्रावर 70 डिग्री तापमान
सुरुवातीला इस्रोच्या शास्त्रज्ञांनी चंद्राच्या गोलार्धावर 20 डिग्री सेंटिग्रेड ते 30 डिग्री सेंटिग्रेड तापमान असेल असा अंदाज व्यक्त केला होता. मात्र त्यांचा हा अंदाज चुकीचा ठरला आहे. प्रत्यक्षात चंद्रावर 70 डिग्री सेंटिग्रेड तापमान असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे याचेच आश्चर्य इस्रोच्या शास्त्रज्ञांना वाटत आहे. “हे आश्चर्यकारक आहे. आम्ही अशी कल्पना केली नव्हती पृथ्वीवर क्वचितच अशी गोष्ट असू शकते. त्यामुळेच चांद्रयान 3 चे निष्कर्ष अत्यंत अत्यंत महत्त्वाचे आहेत” असे इस्त्रोच्या शास्त्रज्ञांकडून सांगण्यात आले आहे.
विक्रम पेलोडने चंद्रावरील गोलार्धाचे तापमान वेगवेगळ्या पद्धतीने मोजले आहे. याची माहिती शास्त्रज्ञांना पाठवण्यात आली आहे. यामध्ये, पृथ्वीपेक्षा चंद्रावरील तापमानात 50 डिग्रीचा सेंटिग्रेडचा फरक असल्याचे समोर आले आहे. सध्या चंद्रावर 70 डिग्री सेल्सिअस पासून ते शून्य आणि 10 डिग्री सेल्सिअसच्या खाली तापमान आहे. यासंदर्भातील काही ग्राफ इस्रोने जारी केला आहे. या ग्राफवरून चंद्राच्या तापमानाचा अंदाज घेण्यात येत आहे.
शास्त्रज्ञांसाठी आश्चर्यकारक बाब
जमिनीवरील साधारण तापमान 50 डिग्रीच्या आसपास असते. तर 20 सेंटीमीटरच्या उंचीवर हे तापमान 60 डिग्री सेल्सिअसने अधिक वाढते. तसेच, -80 सेमीवर खोल जमिनीच्या आत तापमान शून्य ते 10 डिग्री सेल्सिअसपर्यंत येते. मात्र चंद्रावरील तापमान याच्या वेगळे आहे. चंद्रावर तब्बल 70 डिग्री सेल्सिअस तापमान आहे. शास्त्रज्ञांच्या हाती ही माहिती लागल्यामुळे त्यांना एक वेगळेच आश्चर्य वाटत आहे. या माहितीच्या आधारे शास्त्रज्ञ चंद्रावरील इतर बाबींचा देखील अंदाज घेऊ शकतात.
दरम्यान, विक्रम पेलोडने चंद्रावरील दिवसाचे तापमान मोजले आहे. चंद्रावर देखील एक दिवस सुरू आहे. शास्त्रज्ञांनी चंद्रावरील तापमानाचा अंदाज घेण्यासाठी चंद्राचा दक्षिण ध्रुव भाग निवडला आहे. या भागात चंद्राची किरणे फार कमी पडतात. आता इस्त्रोची ही मोहीम यशस्वी झाल्यामुळे शास्त्रज्ञ चंद्रावरील वेगवेगळ्या गोष्टींचा शोध घेऊ शकतात. यातूनच चंद्रावर पाणी किती आहे याची देखील माहिती शास्त्रज्ञांना मिळू शकते.