Gold Price Today : ग्राहकांसाठी सुवर्णसंधी! सोने चांदीच्या भावात लक्षणीय घसरण, जाणून घ्या आजच्या किमती

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Gold Price Today | येत्या बुधवारी हिंदू संस्कृतीतील सर्वात महत्त्वाचा रक्षाबंधन सण आला आहे. या सणानिमित्त सराफ बाजारात मोठ्या प्रमाणात सोन्या चांदीची खरेदी करण्यात येत आहे. तसेच, नविन डिझाइन्स ही बाजारात आल्यामुळे दाग दागिन्यांची खरेदी करण्यात येत आहे. या काळात चांदीच्या राख्यांना जास्त प्रमाणात मागणी असते. तर बहिणीला गिफ्ट म्हणून देण्यासाठी सोन्याचे कानातले, पैंजण, ब्रेसलेट अशा गोष्टी खरेदी केल्या जातात. ऐन सणासुदीला सोने चांदीचे भाव उतरल्यामुळे ग्राहकांसाठी खरेदीची ही सुवर्णसंधी चालून आली आहे. आज (सोमवारी) संपूर्ण एक आठवड्यानंतर घसरले आहेत.

ऑनलाईन वेबसाईटनुसार देखील सोन्या चांदीच्या मूळ (Gold Price Today) किमती कमी दाखवल्या जात आहेत. MCX वेबसाईटवर 22 कॅरेट सोन्याचा बाजार भाव प्रति 10 ग्रॅमने 55,230 रुपयेच असा सुरू आहे. यासोबत 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅमने 60,250 रूपयांनी व्यवहार करत आहे. तर, गुडरिटर्न्सनुसार, सोमवारी सोन्याच्या किमती घसरल्या आहेत. 22 कॅरेट सोन्याचा प्रति 10 ग्रॅम भाव 54,450 रूपयांनी वाढला आहे. तसेच, 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅमने 59,400 रूपयांनी व्यवहार करत आहे. यातूनच सोन्याचे भाव उतरलेले समजत आहेत.

Gold Price Today
Gold Price Today

गुडरिटर्न वेबसाईटनुसार सोन्याचे आजचे भाव (Gold Price Today)

22 कॅरेट सोन्याचा दर आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)

पुणे- 54,450 रुपये
मुंबई – 54,450 रुपये
नागपूर – 54,450 रूपये

24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम)

पुणे- 59,400 रूपये
मुंबई – 59,400 रूपये
नागपूर – 59,400 रुपये

Gold Price Today

चांदीचे भाव

आज सलग तिसऱ्या दिवशी मौल्यवान चांदीचे भाव स्थिर आहेत. सोमवारी, 10 ग्रॅम चांदी 769 रुपयांनी व्यवहार करत आहे. तर 100 ग्रॅम चांदीचा भाव, 7,480 रुपये असा सुरू आहे. 1000 ग्रॅम चांदी 7,690 रुपयांनी व्यवहार करत आहे. मंगळवारी सराफ बाजारात चांदी याच भावाने विकली जात होती. आजही चांदीच्या किमतीत बदल न झाल्यामुळे चांदी खरेदी करण्यासाठी जास्त गर्दी दिसत आहे. त्यामुळे आजचा दिवस चांदी खरेदी करण्यासाठी योग्य आहे. आज जर ग्राहकांनी चांदीची खरेदी केली तर त्यांना ती परवडू शकते.

दररोज जाणून घ्या सोन्या-चांदीच्या किमती

सराफ बाजारात रोज सोन्या-चांदीचे दर बदलत असतात. त्यामुळे ग्राहक सराफ दुकानात जाऊन सतत सोने चांदीच्या भावांची चौकशी करू शकत नाही. त्यामुळेच २२ कॅरेट आणि १८ कॅरेट सोन्याचे भाव जाणून घेण्यासाठी ग्राहक 8955664433 वर मिस कॉल करू शकता. यानंतर थोड्याच वेळात तुमच्या फोनवर एसएमएस द्वारे सोन्याचे भाव सांगितले जातील. तसेच , रोजच्या अपडेटसाठी आयबीजेएच्या संकेतस्थळाला ही भेट देऊ शकता.