नारायण राणेंच्या प्रवेशावर चंद्रकांत पाटील म्हणतात

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई प्रतिनिधी| नारायण राणे भाजपमध्ये सामील होणार अशा चर्चा मागील काही दिवसापासून सतत सुरु आहेत. त्यांच्या भाजप प्रवेशाला शिवसेना विरोध करेल असे बोलले जाते आहे. मात्र शिवसेना मवाळ भूमिकेत असल्याने राणेंचा भाजप प्रवेश होईल असे बोलले जाते आहे. याच संदर्भात चंद्रकांत पाटील यांना विचारले असता त्यांनी त्यावर मत व्यक्त केले आहे.

नारायण राणे यांना भाजपमध्ये घेण्यात येणार आहे. मात्र त्याआधी त्यांच्या भाजप प्रवेशासंदर्भात शिवसेनेला विश्वासात घेतले जाणार आहे अशी प्रतिक्रिया चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते. भाजप शिवसेनेच्या युतीची घोषणा कधी होणार असा प्रश्न चंद्रकांत पाटील यांना विचारला असता त्यांनी त्या प्रश्नाचे उत्तर देण्याचे टाळले आहे. कॉलेजमध्ये असताना मी ज्योतिष शस्त्राचा अभ्यास केला होता. आता मी ज्योतिषशास्त्र अभ्यासात नाही असे चंद्रकांत पाटील यांनी म्हणले आहे.

दरम्यान नारायण राणे यांच्या भाजप प्रवेशाबाबत सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या भाजप नेत्यांना देखील कसलीच अडचण नसल्याचे स्पष्टीकरण भाजपचे जिल्हा अध्यक्ष प्रमोद जठार यांनी दिले आहे. आपल्याला चंद्रकांत पाटील यांचा काल रात्री फोन आला होता. त्यांनी नारायण राणेंच्या भाजप प्रवेशावर आपल्या सोबत चर्चा केली आहे असे प्रमोद जठार म्हणाले आहेत. त्यामुळे नारायण राणे यांचा भाजप प्रवेश कधी होणार आणि त्यांच्या घरात कोणाकोणाला भाजपची उमेदवारी मिळणार हे बघण्यासारखे राहणार आहे.