औरंगाबाद जिल्ह्यातील पेट्रोलपंपांच्या वेळेत बदल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद : कोरोना आजाराचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्हाधिका-यांनी जिल्ह्यातील पेट्रोलपंपांच्या वेळांत काही बदल केले आहेत. आज दि. 27 व 28 मार्च म्हणजे शनिवार व रविवार रोजी फक्त अत्यावश्यक सेवा, आरोग्य ॲम्बुलन्स सेवा, पोलीस प्रशासन, शेती माल वाहतूक सेवा यांनाच पेट्रोल व डिझेल मिळणार आहे.

सोमवार 29 मार्चपासून ते 4 एप्रिल पर्यंत रात्री 8 वाजेपासून ते सकाळी 5 वाजेपर्यंत पेट्रोलपंप बंद राहील, तर सकाळी 5 वाजेपासून ते रात्री 8 वाजेपर्यंत ग्राहकांच्या सेवेसाठी चालू राहतील.

या बंद काळात या परिसरातील काही पेट्रोलपंपांवर पेट्रोल व डिझेल यांची छुप्या मार्गाने विक्री करत असेल तर त्यांच्यावर कडक व कठोर कारवाई करण्यात येईल, असे कडक आदेश जिल्हाधिका-यांनी दिले आहेत.

औरंगाबाद जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

Leave a Comment