खेड ग्रामपंचायतीत सत्तांतर, राष्ट्रवादीला झटका : शिंदे गटाची सत्ता

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी शुभम बोडके
आज जाहीर ग्रामपंचायत निवडणुकीत जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या खेड ग्रामपंचायतीत राष्ट्रवादीच्या आ. शशिकांत शिंदे गटाला मोठा धक्का बसला आहे. येथे शिंदे गटाचे आ. महेश शिंदे यांच्या खेड ग्राम विकास परिवर्तन पॅनेलने 13-4 अशा फरकाने राष्ट्रवादीच्या खेड ग्रामविकास पॅनेलचा पराभव केला. शिंदे गटाने राष्ट्रवादीला धोबीपछाड करत सत्तांतर घडविले आहे. लोकनियुक्त सरपंचपदी लता अशोक फरांदे यांनी विरोधातील राष्ट्रवादीच्या उमेदवार अनिता वैभव बोराटे यांचा थोडक्या मतांनी पराभव केला.

खेड ग्रामपंचायत मधील विजय उमेदवार वाॅर्ड निहाय पुढीलप्रमाणे ः- वनवासवाडी वॉर्ड क्रमांक 1 मध्ये (आ. महेश शिंदे गट विजयी) विनोद दिनकर माने, संतोष चंद्रकांत शिंदे, सुषमा नामदेव लोखंडे. वाॅर्ड क्रमांक 2 कृष्णानगरमध्ये (आ. महेश शिंदे गट विजयी) स्मिता शिवाजीराव शिंदे, सुमन मारुती गंगणे, सुधीर राजाराम काकडे, वाॅर्ड क्रमांक 3 खेड गावठाणमध्ये (आ. महेश शिंदे गट विजयी) शरद शिवाजी शेलार, वंदना संजय गायकवाड, वाॅर्ड क्रमांक 4 प्रतापसिंह नगरमध्ये (आ. शशिकांत शिंदे गट1 जागांवर विजयी) अजित गायकवाड तर दोन जागेवर आ. महेश शिंदे गटाचे कांतीलाल विष्णू कांबळे, दिपाली संदीप चव्हाण. वाॅर्ड क्रमांक 5 विकास नगरमध्ये (आ. शशिकांत शिंदे गट विजयी) निखिल विजय यादव, सुशिला आप्पासाहेब कांबळे, शोभा गजानन फडतरे. वाॅर्ड क्रमांक 6 वनवासवाडी वॉर्डमध्ये (आ. महेश शिंदे गट विजयी) चंद्रभागा रामचंद्र माने, प्रियांका कैलास संकपाळ, शिवाजी शामराव कोळपे यांचा समावेश आहे.

राष्ट्रवादी काॅंग्रेसचे विधानपरिषद आ. शशिकांत शिंदे आणि शिंदे गटाचे आ. महेश शिंदे यांच्या गटात झालेल्या निवडणुकीत अनेक वाॅर्ड क्र. 4 प्रतापसिंह नगरमध्ये अटीतटीची निवडणूक दिसून आली. येथे एक जागा आ. महेश शिंदे यांच्या गटाला मिळाली तर दोन जागा आ. शशिकांत शिंदे यांच्या गटाला मिळाले असल्याने येथे क्राॅस वोटींगचा प्रकार समोर आला आहे. तर पाच नंबरचा वाॅर्ड सोडता. खेड ग्रामपंचायतीच्या एक, दोन, तीन आणि सहा क्रमांकाच्या वाॅर्डात सर्वच्या सर्व जागांवर विजय मिळवला आहे. कार्यकर्त्यांनी सत्तांतर करीत विजय मिळवताच साताऱ्यातील पोवई नाका येथे गुलालाची उधळण करीत जल्लोष केला.