औरंगाबाद – छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण मुक्त पद्धतीने होऊच शकत नाही. यामुळे क्रांती चौकातील शिवरायांच्या पुतळा अनावरण सोहळ्याची मध्यरात्रीची वेळ बदला, अन्यथा रात्री दहा वाजल्यानंतर शिवप्रेमींना वाद्य वाजवण्याची परवानगी द्या, अशी मागणी जिल्हा शिवजयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष अभिजित देशमुख आणि माजी अध्यक्ष विनोद पाटील यांनी काल पत्रकार परिषदेत केली.
क्रांती चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याचे अनावरण उद्या मध्यरात्री करण्यात येणार असल्याचे महापालिकेने मंगळवारी जाहीर केले. रात्री दहानंतर वाद्य वाजवण्यावर सर्वोच्च न्यायालयाचे निर्बंध आहेत. शिवजयंतीची जय्यत तयारी करणारे शिवप्रेमी क्रांती चौकातील शिवस्मारकाच्या अनावरण समारंभाची हे आतुरतेने प्रतीक्षा करत आहेत. शिवस्मारकाचे अनावरण मोठ्या जल्लोषात व्हावे अशी लाखो शिवप्रेमींची इच्छा आहे. असे असताना मध्यरात्री मुख्य पद्धतीने अनावरण सोहळ्याचे आयोजन कशासाठी करण्यात आले आहे? असा सवाल विनोद पाटील यांनी केला.
विनोद पाटील म्हणाले की, राज्यात विविध निवडणुका झाल्या तेव्हा त्या गर्दीत कोरुना पसरला नाही. आता शिवप्रेमींनी वर निर्बंध लादून गुन्हा नोंदवण्याचा इशारा देणे अन्यायकारक आहे. मराठा क्रांती मोर्चाचा वाहन रॅलीला पोलिसांनी परवानगी नाकारली कार्यकर्त्यांना नोटिसा बजावण्यात आल्या. शिवसेनेनेही ‘एक राजा एक जयंती’ या तत्वानुसार 19 फेब्रुवारी रोजी जयंतीत सहभागी व्हावे असे आवाहन आम्ही करतो. यावेळी राजू शिंदे, मनोज पाटील, प्रा. चंद्रकांत भराट, सुरेश वाकडे, मनोज गायके, सुमित खांबेकर उपस्थित होते.