औरंगाबादेतील लाॅकडाऊनमध्ये बदल

पेट्रोलपंप, हाॅटेल्ससाठी नवी नियमावली

औरंगाबाद | राज्यात पुन्हा एकदा कोरोनाचा धोका मोठ्या प्रमाणात वाढत आहे. जिल्ह्यात रुग्ण संख्याही मोठ्या प्रमाणात वाढतेय. औरंगाबादेतील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यात आज मध्यरात्रीपासून 8 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आला होता. त्यात आता काहीसा बदल करण्यात आला आहे. आता हा लॉकडाऊन 31 मार्च ते 9 एप्रिल दरम्यान असणार आहे. यात पेट्रोल पंप आणि हॉटेल्ससाठी काही नवी नियमावली जारी करण्यात आली आहे. नव्या नियमावलीनुसार लॉकडाऊनच्या काळात सकाळी 8 ते दुपारी 12 वाजेपर्यंत पेट्रोल पंपावर नागरिकांना पेट्रोल उपलब्ध असणार आहे.

तसेच हॉटेलमध्येही रात्री 8 वाजेपर्यंत होम डिलिव्हरी देऊ शकणार आहेत. प्रशासनाच्या सुधारित आदेशानुसार लॉकडाऊनच्या काळात नागरिकांना सकाळी 8 ते दुपारी 12 वाजेपर्यंत इंधन उपलब्ध असेल. तर 12 नंतर फक्त अत्यावश्यक सेवेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना ओळखपत्र दाखवल्यानंतर इंधन मिळेल. त्याचबरोबर शहरात होम आयसोलेशनची संख्या मोठी असल्यानं हॉटेल्सना रात्री 8 वाजेपर्यंत होम डिलिव्हरी करण्याची मुभा देण्यात आली आहे.

लॉकडाऊन दरम्यान शहरात तगडा पोलीस बंदोबस्त तैनात केला जाणार आहे. चौकाचौकात, गल्लीबोळात पोलीस पेट्रोलिंग करतील. त्याचबरोबर 16 पोलीस ठाण्याअंतर्गत ठराविक चौकात पोलिसांचा खडा पहारा असणार आहे. यावेळी पोलिसांच्या मदतीला होमगार्डही असणार आहेत.

औरंगाबाद जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

You might also like