राणे बंधूंवर गुन्हा दाखल; पवारांवरील ‘ते’ वक्तव्य भोवणार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजप नेते निलेश राणे आणि नितेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निलेश राणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा संबंध कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम याच्याशी जोडला होता त्यांनतर राष्ट्रवादी आक्रमक झाली असून राष्ट्रवादीचे नेते सुरज चव्हाण यांनी गुन्हा दाखल केला असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

राणे बंधूनी शरद पवार यांचे आतंरराष्ट्रीय गुन्हेगार दाऊदशी संबंध असल्याचे वक्तव्य वारंवार करत आहेत. राणे बंधू यांनी अनिल देशमुख हिंदू आहेत म्हणून त्यांचा राजीनामा घेतला. तर नवाब मलिक मुस्लिम आहेत म्हणून त्यांचा राजीनामा घेतला जात नाही, असे वक्तव्य केली जात आहेत. त्यामुळे दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. तसेच शरद पवार यांचा दाऊदशी संबंध आहे, असे वक्तव्य़ करून शरद पवार याच्या जीवाला धोका निर्माण केला असल्याने राष्ट्रवादीचे नेते सुरज चव्हाण यांनी मरीन ड्राईव्ह पोलिसांत गुन्हा दाखल केला दाखल केला आहे

दरम्यान, या प्रकरणा नतंरही निलेश राणे यांनी आपल्या विधानाचा पुनरुच्चार केला आहे. कितीही माझ्यावर केसेस घातले तरी मी म्हणतच राहणार, मला संशय आहे आणि राहणारच की पवार साहेब दाऊदची व्यक्ती आहे असे त्यांनी पुन्हा एकदा म्हंटल

Leave a Comment