रांची : वृत्तसंस्था – छत्तीसगड राज्याचे माजी मुख्यमंत्री डॉ. रमण सिंह (former cm raman singh) यांनी एक खळबळजनक वक्तव्य करून राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून दिली आहे. छत्तीसगडचे सध्याचे मुख्यमंत्री भूपेश बघेल हे काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांचे ATM आहेत, असे वक्तव्य त्यांनी (former cm raman singh) केले आहे. त्यांच्या या वक्तव्यावरून भूपेश बघेल प्रचंड संतापले असून या वक्तव्याचा पुरावा द्या नाही तर मानहानीचा दावा ठोकतो, असा इशारा त्यांनी डॉ. रमण सिंह (former cm raman singh) यांना दिला आहे.
रमण सिंह यांनी केला आरोप
छत्तीसगडमध्ये मंगळवारी सकाळपासून ईडीची छापेमारी सुरु आहे. राज्यातील या ईडीच्या छापेमारीवर माजी मुख्यमंत्री रमण सिंह (former cm raman singh) यांनी हे वक्तव्य केले आहे. भूपेश बघेल हे सोनिया गांधींचे एटीएम असल्याचं मी वर्षभरापासून सांगतोय. हा हजारो कोटींचा घोटाळा आहे. जमा झालेला पैसा आसाम, त्यानंतर हिमाचल प्रदेशात पाठवला जातो. कलेक्टरला कलेक्शन एजंट बनवलंय. आज त्याच एजंटच्या घरावर ईडी छापेमारी करत आहे, असा आरोप रमण सिंह यांच्याकडून करण्यात आला आहे.
मानहानीचा दावा ठोकणार
रमण सिंहांच्या (former cm raman singh) या वक्तव्याला प्रत्युत्तर देताना भूपेश बघेल यांनी तुमचे आरोप आधी सिद्ध करा किंवा जाहीर माफी मागा. नाही तर योग्य ती कारवाई करून मानहानीचा दावा ठोकण्यात येईल असा इशारा दिला आहे.
हे पण वाचा :
बिहारमध्ये आणखी मोठी राजकीय उलथापालथ होणार; प्रशांत किशोर यांचं भाकीत
Airtel च्या ‘या’ प्लॅनमध्ये फ्री मध्ये मिळवा Amazon Prime चे सब्सक्रिप्शन !!!
‘धर्मवीर’ चित्रपटाबाबत केदार दिघेंचं मोठं विधान; म्हणाले कि…
Atal Pension Yojana द्वारे रिटायरमेंटनंतर मिळवा खात्रीशीर पेन्शन !!!
दहीहंडीचा समावेश आता क्रीडा प्रकारात होणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा ऐतिहासिक निर्णय