हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्याच्या काळात बाजारात अनेक नवनवीन स्मार्टफोन लाँच केले जात आहेत. बाजारात OnePlus 11 आणि OnePlus 11R सारखे प्रीमियम फोन लाँच केल्यानंतर OnePlus आता Nord सिरीजमधील नवीन हँडसेट OnePlus Nord 3 लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. मात्र हा स्मार्टफोन लॉन्च होण्याआधीच त्याचे फीचर्स लीक झाले आहेत. एका मीडिया रिपोर्ट्स नुसार, OnePlus Nord 3 जूनच्या मध्यात किंवा जुलैमध्ये जागतिक स्तरावर लॉन्च केला जाईल. यामध्ये कंपनीकडून ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप दिला जाण्याची शक्यता आहे.
Tipster Onleaks च्या हवाल्याने MysmartPrice कडून या फोनच्या फीचर्स बाबतची माहिती शेअर करण्यात आली आहे.इथे हे जाणून घ्या की, जुलै 2021 मध्ये OnePlus Nord सीरीजचा OnePlus Nord 2 लाँच करण्यात आला होता.
या नवीन OnePlus Nord 3 मध्ये 6.72 इंच मोठा AMOLED डिस्प्ले दिला जाऊ शकेल,जो फुलएचडी+ रिझोल्यूशनसहीत येईल. ज्याचा रिफ्रेश रेट 120 Hz असू शकेल. तसेच हा स्मार्टफोन ऑक्टा-कोर डायमेन्सिटी 9000 प्रोसेसरने सुसज्ज असेल. यासोबतच सिक्योरिटीसाठी फिंगरप्रिंट सेन्सर देखील उपलब्ध असेल. कंपनीकडून 8 GB RAM + 128 GB आणि 16 GB RAM + 256 GB असे दोन व्हेरिएंट दिली जाण्याची शक्यता आहे.
OnePlus Nord 3 मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला जाईल. यामध्ये 50 मेगापिक्सेल प्रायमरी, 8 मेगापिक्सेल अल्ट्रा-वाइड आणि 2 मेगापिक्सेल मॅक्रो लेन्स असू शकतील. तसेच सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी यामध्ये 16-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात येईल. यामध्ये 5000mAh बॅटरी मिळेल, जी 80W SuperVOOC चार्जिंगला सपोर्ट करेल. यामध्ये अलर्ट स्लाइडर देखील दिला जाईल.
यापूर्वी OnePlus Nord CE 3 ची लाइव्ह इमेज समोर आली होती. या लीक झालेल्या इमेजनुसार यामध्ये ग्लॉसी बॅक पॅनल आणि ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप असेल. तसेच यामध्ये फिंगरप्रिंट सेन्सर, 3.5 मिमी ऑडिओ जॅक आणि यूएसबी टाइप-सी पोर्ट सारखे फीचर्स उपलब्ध असतील.
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.mysmartprice.com/mobile/oneplus-nord-3-5g-msp18261
हे पण वाचा :
Charger : आपला फोन वारंवार चार्ज करण्याने त्याच्या बॅटरीवर काय परिणाम होईल ते जाणून घ्या
Digital Gold : आता फक्त 1 रुपयात खरेदी करता येईल सोने, जाणून घ्या त्यासाठीची प्रक्रिया
FD Rates : ‘या’ 6 बँकांच्या FD मध्ये पैसे जमा करून मिळवा दुप्पट नफा
Yes Bank ने वाढवले FD वरील व्याजदर, जाणून घ्या ग्राहकांना किती फायदा मिळणार
Cardless Cash Withdrawal : आता डेबिट कार्ड नसतानाही ATM मधून काढता येतील पैसे, कसे ते जाणून घ्या