हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतात तर अनेक पर्यटन स्थळे फिरण्यासाठी आहेत. येथील पर्यटन स्थळांप्रमाणे नेपाळमध्येही अशी काही ठिकाणे आहेत कि त्या ठिकाणी गेल्यावर साक्षात स्वर्गात गेल्यासारखे वाटते. तुम्हाला अगदी कमी बजेटमध्ये नेपाळचा दौरा करायचा असेल तर IRCTC च्या वतीने खास टूर पॅकेज जाहीर करण्यात आले आहे. या पॅकेजद्वारे तुम्ही नेपाळमधील निसर्गरम्य ठिकाणाचा आनंद आणि पशुपतिनाथचे दर्शन घेऊ शकतात. पाहूया त्याविषयी…
नेपाळ हा जगातील सुंदर देशांपैकी एक आहे. हा देश पर्यटकांसाठी स्पेशल आहे. काठमांडू खोऱ्यात असलेले भक्तपूर नेपाळमध्ये फिरणाऱ्या लोकांना आकर्षित करण्याचे काम करते. भक्तपूरला भक्तांचे शहर असेही म्हणतात. नेपाळ हे पर्यटनाच्या दृष्टीने उत्तम ठिकाण आहे.
नेपाळमध्ये निसर्ग सौंदर्याव्यतिरिक्त अनेक धार्मिक स्थळेही आहेत. जिथे लोक मोठ्या संख्येने भेट देतात. येथे जाऊन तुम्ही अॅडव्हेंचर आणि निसर्गाचा भरपूर आनंद घेऊ शकता. IRCTC भोपाळ ते नेपाळ या धार्मिक प्रवासासाठी अतिशय आलिशान आणि बजेटमध्ये बसेल असे टूर पॅकेज देत आहे. या हवाई टूर पॅकेजमध्ये तुम्हाला काठमांडू आणि पोखरा येथे जाण्याची संधी मिळेल.
पशुपतिनाथ मंदिर, नेपाळ
नेपाळमधील पशुपतीनाथ मंदिर हे जगातील सर्वात प्राचीन हिंदू मंदिरांपैकी एक आहे. हे मंदिर काठमांडूमध्ये बागमती नदीच्या काठावर आहे. या मंदिरात भगवान शंकराचे रूप असलेल्या पशुपतीची पूजा केली जाते. मंदिराच्या गर्भगृहात शिवाची सुमारे 1 मीटर उंचीची चारमुखी मूर्ती स्थापित आहे. काठमांडूतील बागमती नदीच्या काठावर असलेल्या या मंदिरात भगवान शंकराचे एक रूप असलेल्या पशुपतीची पूजा केली जाते. युनेस्कोने या मंदिराला जागतिक वारसा स्थळाचा दर्जा दिला आहे. पशुपतीनाथ मंदिर सुंदर दृश्यांनी वेढलेले हे मंदिर भगवान शिवाला समर्पित आहे.
नेपाळ पर्यटनस्थळ
उत्तरेला चीन आणि दक्षिण, पूर्व व पश्चिमेला भारत या दोन देशांच्या मध्यभागी असलेला लहानसा आणि अप्रतिम निसर्गसौंदर्याने नटलेला देश म्हणजे नेपाळ. काठमांडू शहरापासून पोखरा हे ठिकाण २०३ किलोमीटर अंतरावर असून महामार्गाने येथे पोहोचण्यास सहा तासांचा कालावधी लागतो. नेपाळमधील हे दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. या शहरातील फेवा सरोवर जगभरातील पर्यटकांसाठी पर्वणीच आहे.
पॅकेजची ‘या’ दिवसापासून होणार सुरुवात
या पॅकेजला बेस्ट ऑफ नेपाळ एक्स दिल्ली असे नाव देण्यात आले आहे. पॅकेजची सुरुवात दिल्लीपासून होईल. 6 दिवस आणि 5 रात्रींचे हे टूर पॅकेज 30 मार्च 2023 पासून सुरू होईल. पॅकेजमध्ये दिल्लीहून काठमांडूला फ्लाइटने नेले जाईल. यानंतर काठमांडू ते दिल्ली या विमानानेच परतीचा प्रवास होईल.
किती रुपयाचे पॅकेज?
खास पॅकेजमध्ये अनेकल गोष्टींचा समावेश करण्यात आलेला आहे. या पॅकेजमध्ये विमानाचे भाडे, बस, हॉटेल, भोजन, मार्गदर्शक आणि विमा इत्यादी सुविधांचा समावेश आहे. कंफर्ट क्लासमध्ये ट्रिपल किंवा डबल ऑक्यूपेंसीवर प्रति व्यक्ती खर्च 31,000 रुपये आहे. तर सिंगल ऑक्यूपेंसीसाठी प्रति व्यक्ती किंमत 40,000 रुपये आहे. 2 ते 11 वर्षे वयोगटातील मुलासाठी बेडसह 30,000 रुपये आणि बेडशिवाय 24,000 रुपये शुल्क आकारले जाणार आहे.