Cheapest 7 Seater Car : भारतातील ‘या’ सर्वात स्वस्त 7 सीटर कार्सचे फीचर्स अन् किंमत जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Cheapest 7 Seater Car : कोरोना काळात सर्वाधिक फटका बसलेल्या क्षेत्रांपैकी ऑटो सेक्टर एक होते. यानंतर आता हे या क्षेत्राने गरुड भरारी घेत जोरदार पुनरागमन केले आहे. हे लक्षात घ्या कि, गेल्या काही वर्षांत 7 सीटर कारच्या मागणीमध्ये मोठी वाढ झाली आहे. ज्याच्या परीणामी आता कार उत्पादक कंपन्या एकामागून एक नवीन मॉडेल्स लाँच करत आहेत. ज्यामुळे आता ग्राहकांना कमी किंमत असलेले 7-सीटर MPV आणि SUV चे अनेक पर्याय मिळाले आहेत. तर आजच्या या बातमीमध्ये आपण 10 लाख रुपये (एक्स-शोरूम) अंतर्गत उपलब्ध असलेल्या 7-सीटर कारची माहिती जाणून घेउयात…

Mahindra Bolero Price - Images, Colours & Reviews-91Wheels

Mahindra Bolero

Mahindra च्या सर्वाधिक विक्री होणाऱ्या कारपैकी ही एक कर आहे. ज्याची किंमत 9.53 लाख ते 10.48 लाख रुपयांपर्यंत (एक्स-शोरूम) आहे. यामध्ये 1.5-लिटर डिझेल इंजिन मिळते, जे 75 PS आणि 210 Nm जनरेट करते. फीचर्स बाबत बोलायचे झाल्यास, यामध्ये डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, एअर कंडिशनिंग, AUX आणि USB कनेक्टिव्हिटीसह ब्लूटूथ-एनेबल म्युझिक सिस्टीम, पॉवर विंडो आणि पॉवर स्टीयरिंग व्हील देण्यात आले आहे. Cheapest 7 Seater Car

Renault Triber Price - Images, Colours & Reviews - CarWale

Renault Triber

ही भारतातील सर्वात स्वस्त 7 सीटर कार म्हणून ओळखली जाते. या करची किंमत 5.92 लाख रुपये ते 8.51 लाख रुपये आहे. तसेच यामध्ये 1.0-लिटर नॅच्युरली एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन मिळेल, जे 72 PS ची मॅक्सिमम पॉवर आणि 96 Nm चे पीक टॉर्क जनरेट करेल. तसेच यामध्ये 5-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन आणि 5-स्पीड एएमटीचा पर्याय देखील उपलब्ध आहे. फीचर्स बाबत बोलायचे झाल्यास, यामध्ये अँड्रॉइड ऑटो आणि ऍपल कारप्लेसहीत 8-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टीम, प्रोजेक्टर हेडलॅम्प, स्टीयरिंग-माउंटेड कंट्रोल्स, पुश-बटण स्टार्टस्टॉप आणि डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर देण्यात आले आहे. Cheapest 7 Seater Car

Maruti Suzuki Ertiga Price in India, Images, Specs, Mileage | AutoPortal.com

Maruti Suzuki Ertiga

देशातील सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या 7-सीटर कार पैकी Ertiga देखील एक आहे. ज्याची किंमत 8.35 लाख रुपये ते 12.79 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे. यामध्ये 1.5-लिटर पेट्रोल इंजिन मिळते, जे 103 PS पॉवर आणि 137 Nm टॉर्क जनरेट करते. तसेच यामध्ये सीएनजीचा पर्याय देखील देण्यात आला आहे. या कारच्या फीचर्स बाबत बोलायचे झाल्यास, यामध्येअँड्रॉइड ऑटो आणि ऍपल कारप्लेसहीत 7-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टीम, पॅडल शिफ्टर्स (फक्त एटी), क्रूझ कंट्रोल, ऑटो हेडलाइट्स आणि ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल देण्यात आले आहे. Cheapest 7 Seater Car

अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : https://www.marutisuzuki.com/price-list/ertiga-price-in-pune-in-maharashtra

हे पण वाचा :
Train Cancelled : रेल्वेकडून आजही 247 गाड्या रद्द !!! घर सोडण्यापूर्वी रद्द झालेल्या गाड्यांची लिस्ट तपासा
Business Idea : थंडीच्या दिवसांत ‘हा’ व्यवसाय सुरू करून मिळवा हजारो रुपये
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या किंमतींत वाढ, आजचे दर तपासा
Amazon Sale मध्ये अर्ध्यापेक्षा कमी किंमतींत खरेदी करा ‘हे’ Smart LED TV
Bank Holiday : नवीन वर्षाच्या पहिल्या महिन्यात बँका इतके दिवस राहणार बंद, सुट्ट्यांची लिस्ट तपासा