पैसे पडले सांगत महिलेला सव्वा लाखांना घातला गंडा

0
51
Untitled design
Untitled design
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

 

प्रतिनिधी पुणे |  तक्रारदार महिला वडगाव हायवे खालील वांजळे चौकात फोन वर बोलत असताना तीन युवकांनी त्यांना तुमचे पैसे पडले आहेत असं भासवून त्यांना गाडीतुन उतरण्यास भाग पाडले त्यांनतर आरोपीतील एकाने गाडीतील मागच्या सीट वर एक लाख पंचवीस हजार रुपये रक्कम असलेली बेग आणि पाच चेक घेऊन पसार झाले.

सदर घटना ही सिंहगड रोड येथील वडगाव येथे दिनांक २०/२/२०१९ रोजी सायंकाळी ६.४० दरम्यान घडली असून सिंहगड पोलीस स्टेशन मध्ये अज्ञात विरोधात भादविक ३७९,३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आलाआहे. सिंहगड रोड परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून च्या या घटना रोखण्यात पोलिसांना अपयश आले आहे.

पुणे शहरात गेल्या महिन्यात १५ दिवसांत १२ खून झाल्यावर शहरात खळबळ उडाली होती. तसेच पोलीस खाते काय करते असा प्रश्न उपस्थित झाला होता. चोरीच्या घटना या सिंहगड रोडच नव्हे तर पुणे शहरात अनेक ठिकाणी होतात त्यावर कडक प्रशासन करून चोरट्यांना कठोर शिक्षा देऊन शहर गुन्हे मुक्त कधी होईल हा एक मोठा प्रश्नच आहे. या घटनेचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक बी.डी. साळुंखे करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here